Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे भाव वाढले की घसरले? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:42 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज मिश्र स्वरूपाचे चित्र दिसून आले.विविध बाजार समित्यांमध्ये एकूण सुमारे १० हजार ३६३ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली.

वाढती आवक आणि दर्जेदार मालाला मिळणारी मागणी यामुळे काही बाजारात दरात वाढ दिसून आली, तर काही बाजार समित्यांमध्ये दरावर दबाव कायम राहिला.

पिवळ्या सोयाबीनला जास्त मागणी

आजच्या व्यवहारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले.

यवतमाळ येथे पिवळ्या सोयाबीनला ५ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

देवणी बाजारातही चांगल्या प्रतीच्या मालाला ५ हजार ५१८ रुपये कमाल दर मिळाला.

अकोला येथे मोठ्या प्रमाणावर आवक (२,२८० क्विंटल) झाली असून सरासरी ५ हजार ३६० रुपये दर मिळाला.

वसमत, सेनगाव, जाफराबाद या बाजारांमध्येही पिवळ्या जातीला स्थिर व समाधानकारक दर मिळाले.

कुठे भाव वधारले?

काही बाजार समित्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या मालामुळे दरात वाढ दिसून आली.

सोलापूर येथे लोकल सोयाबीनला ५ हजार ५५५ रुपये पर्यंत दर मिळाला.

कारंजा बाजारात मोठी आवक (३००० क्विंटल) असूनही दर ५ हजार ४४० रुपये पर्यंत गेले.

तुळजापूर बाजारात स्थिर व्यवहार होत ५ हजार ३५० रुपये दर मिळाला.

देवणी व यवतमाळ या बाजारांमध्येही उच्च प्रतीच्या मालाला चांगले दर मिळाले.

कुठे दर घटले?

काही बाजार समित्यांमध्ये कमी प्रतीचा माल व जास्त आवक यामुळे दरावर दबाव दिसून आला.

पाथरी येथे सोयाबीनला केवळ ३ हजार रुपये दर मिळाला.

मंठा बाजारात दर ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित राहिले.

काटोल, सिंदी, आष्टी (वर्धा) या बाजारांमध्येही सरासरी दर तुलनेने कमी राहिले.

नागपूर बाजारात कमीत कमी दर ४ हजार ४०० रुपये पर्यंत घसरला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2026
अहिल्यानगर---क्विंटल48495051005025
कारंजा---क्विंटल3000505554405225
तुळजापूर---क्विंटल175535053505350
वडवणी---क्विंटल10500056005001
सोलापूरलोकलक्विंटल61536055555440
अमरावतीलोकलक्विंटल2607485053135081
नागपूरलोकलक्विंटल200440053605120
हिंगोलीलोकलक्विंटल400491054105160
मेहकरलोकलक्विंटल420480053205150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल20510153275300
अकोलापिवळाक्विंटल2280508553905360
यवतमाळपिवळाक्विंटल337547054705470
भोकरपिवळाक्विंटल23537053705370
जिंतूरपिवळाक्विंटल3525052505250
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल12536053605360
देउळगाव राजापिवळाक्विंटल1541154115411
नांदगावपिवळाक्विंटल3535953595359
मंठापिवळाक्विंटल49390050005000
मुरुमपिवळाक्विंटल55480153515351
बसमतपिवळाक्विंटल288514052705205
सेनगावपिवळाक्विंटल77510053005200
पाथरीपिवळाक्विंटल10300030003000
बुलढाणापिवळाक्विंटल300480052005000
बाभुळगावपिवळाक्विंटल530460153255001
राजूरापिवळाक्विंटल40404552054905
काटोलपिवळाक्विंटल72400051004800
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल18400051504700
पुलगावपिवळाक्विंटल47488052355100
सिंदीपिवळाक्विंटल40400051504760
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल209445053255000
जाफराबादपिवळाक्विंटल140510053005200
देवणीपिवळाक्विंटल37525055185451

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Tur Bajar Bhav : तूर बाजारात कुठे मिळाले ८ हजार पार भाव? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती