Join us

Soybean Bajar Bhav : दिवाळी नंतर सोयाबीनची मोठी आवक; कसा मिळाला दर ते जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:11 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर शेतकरी सोयाबीनबाजारात आणताना दिसून आले,  आज (२४ ऑक्टोबर) रोजी एकूण ४१ हजार ५९९ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाले. (Soybean Arrival) 

अकोला, अमरावती आणि हिंगोलीतील पिवळ्या व लोकल सोयाबीनला चांगले भाव मिळाले. उच्च प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला ४ हजार ३७० रुपयांपर्यंत भाव मिळत असून, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Soybean Arrival) 

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची चांगली आवक (Soybean Arrival)  झाली. एकूण ४१ हजार ५९९ क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाला. त्यात अमरावती, अकोला, हिंगोली, आणि तुळजापूर या बाजारांनी सर्वाधिक आवक (Soybean Arrival)  नोंदवली.

अकोला बाजारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक ४ हजार ३७० रु. दर मिळाला, तर हिंगोलीत ४ हजार ३३० रु. पर्यंत दर गेले. अमरावतीत आवक सर्वाधिक २२ हजार २०९ क्विंटल असून सरासरी दर ३ हजार ९८० रुपये होता. तुळजापूर बाजारात दर ४ हजार १०० रुपये स्थिर राहिला.

'या' जातींना होती मागणी

पिवळा सोयाबीन : सर्वाधिक मागणी या जातीला दिसली. बहुतेक बाजारांमध्ये ३ हजार ९०० ते ४ हजार ३०० रुपयांदरम्यान दर मिळाला.

लोकल सोयाबीन : सोलापूर व अमरावती बाजारांत चांगली मागणी ३ हजार ५०० ते ४ हजार २३० रुपयांपर्यंत दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/10/2025
जळगाव - मसावत---क्विंटल45325032503250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल410350141833842
राहूरी -वांबोरी---क्विंटल36371140523881
तुळजापूर---क्विंटल1825410041004100
सोलापूरलोकलक्विंटल813350042304000
अमरावतीलोकलक्विंटल22209375042113980
हिंगोलीलोकलक्विंटल900389043304110
अकोलापिवळाक्विंटल7140400043704280
बीडपिवळाक्विंटल817330042003970
पैठणपिवळाक्विंटल58350039603860
जिंतूरपिवळाक्विंटल460370041884020
शेवगावपिवळाक्विंटल72350040004000
परतूरपिवळाक्विंटल298375041754000
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल44350041954002
तळोदापिवळाक्विंटल66320037003500
गंगापूरपिवळाक्विंटल50290039713650
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल26350040003671
किल्ले धारुरपिवळाक्विंटल175331041114050
मंठापिवळाक्विंटल217370041004000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल723367142103940
किनवटपिवळाक्विंटल25380041003950
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल30400042004100
मुरुमपिवळाक्विंटल1012250041523720
उमरगापिवळाक्विंटल124370042004000
सेनगावपिवळाक्विंटल50380041254000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल922360042004000
राळेगावपिवळाक्विंटल200370042354150
उमरखेडपिवळाक्विंटल310385040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल670385040003950
राजूरापिवळाक्विंटल265356539753825
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल800300041503500
सोनपेठपिवळाक्विंटल264350041754051
जाफराबादपिवळाक्विंटल320390041004000
देवणीपिवळाक्विंटल223370042723986

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक कमी; भावात स्थिरता जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Arrival Surges Post-Diwali: Price Analysis and Market Insights

Web Summary : Post-Diwali, soybean arrivals increased, with 41,599 quintals reaching markets. Akola, Amravati, and Hingoli saw good prices for yellow and local varieties. Yellow soybean fetched up to ₹4,370. Amravati recorded the highest arrival at 22,209 quintals, averaging ₹3,980.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती