Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : आवक घटली, दरांना आधार; सोयाबीन बाजाराचा आजचा आढावा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:47 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (२५ डिसेंबर) रोजी सोयाबीनच्याबाजारभावात मोठे चढ-उतार न होता भाव तुलनेने स्थिर राहिले. 

मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत घट झाल्याचे चित्र दिसून आले. आज राज्यभरात एकूण १९ हजार ७९१ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली असून, सरासरी दर ४ हजार ५०३ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला.

आवकेत घट

नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात माल आणण्याऐवजी नोंदणी केंद्रांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे बाजार समित्यांतील आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः लातूर, अकोला, हिंगोली या बाजारांमध्ये आवक असूनही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले. चांगल्या प्रतीच्या, कमी ओलावा असलेल्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

लातूर (पिवळा) : १३,७३६ क्विंटल आवक; दर ४,११३ ते ४,९५० रुपये

अकोला (पिवळा) : ४,०७४ क्विंटल; दर ४,००० ते ४,८४० रुपये

काटोल (पिवळा) : दर ३,२०० ते ४,५८० रुपये

याउलट, लोकल आणि पांढऱ्या जातीच्या सोयाबीनला तुलनेने मर्यादित मागणी दिसून आली.

कोणत्या बाजारात हमीभाव मिळाला?

शासनाने जाहीर केलेला सोयाबीनचा हमीभाव (MSP) सुमारे ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल आहे. आज काही बाजारांमध्ये या दराच्या जवळपास व्यवहार झाल्याचे दिसून आले.

लातूर : कमाल दर ४,९५० रुपये

सोलापूर : कमाल दर ४,८०० रुपये

लासलगाव-निफाड : कमाल दर ४,७५१ रुपये

तरीही बहुतांश बाजारांमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानेच व्यवहार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजाराऐवजी नाफेडकडे विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2025
तुळजापूर---क्विंटल275465046504650
सोलापूरलोकलक्विंटल407417548004600
हिंगोलीलोकलक्विंटल600420047004450
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल205401747514685
लातूरपिवळाक्विंटल13736411349504750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल179385147004200
अकोलापिवळाक्विंटल4074400048404545
पैठणपिवळाक्विंटल5430043004300
काटोलपिवळाक्विंटल310320045804350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : हमीभावाचा दबाव! नाफेडमुळे सोयाबीन बाजारात दराचा खेळ सुरू वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: Arrival Decreases, Prices Supported; Today's Detailed Review

Web Summary : Soybean prices remained relatively stable across major markets on December 25th, despite a decrease in arrivals. The average price was ₹4,503 per quintal, with total arrivals of 19,791 quintals. Farmers are favoring NAFED's guaranteed price purchases, impacting market supply, especially for yellow soybean varieties.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती