Soyabean Market : सोयाबीनचे बाजारभावात दिलासा नसताना दुसरीकडे अतिवृष्टीने खरिपातील सोयाबीनवर पाणी फेरले आहे. आता ऑक्टोबर सुरु झाला आहे. या ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन सरासरी काय भाव मिळतील हे पाहुयात...
सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५३२८ प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील सप्टेबर महिन्यातील सरासरी किंमती पुढीलप्रमाणे होत्या, यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये ५०७१ प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२३ मध्ये ४६६० प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२४ मध्ये ४३६९ प्रति क्विंटल होत्या.
तर आता सुरु असलेल्या ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५१५ रुपये ते ४८९५ रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता आहे. भारतात मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक कमी दिसून येते. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन ११६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे.
सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४ मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १८.० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी सोयाबीन पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.