Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soyabean Market : राज्यात सोयाबीनची आवक वाढली, पण किंमतीत 2.6 टक्के घट, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:16 IST

Soyabean Market : मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या किंमतीत २.६ टक्के घट झाली आहे.

Soyabean Market : सोयाबीन उत्पादक (Soyabean Farmer) शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचेच चित्र आहे. सातत्याने बाजारभावात घसरण सुरू असून मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत ४ हजार ३९५ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत २.६ टक्के घट झाली आहे.

सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रुपये ४ हजार ८९२ रुपये (Soyabean Market) प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. लातूर बाजार सोयाबीनला सरासरी ०४ हजार ३९५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतो आहे. 

तर सोयाबीनची आवक पाहिले असता मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २२ सप्टेंबर नंतर राज्यात आणि देशभरात सोयाबीनची आवक वाढत आहे. राज्यात २० टनांच्यावर तर देशात ८० टनापासून ते १८० टनापर्यंत आवक होऊ लागली आहे. 

मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमत ४ हजार ३९५ रुपये अशी सर्वाधिक होती. तर इंदोर (म.प्र.) बाजारात सरासरी किंमती ४०६८ रुपये प्रति क्विंटल होती. तसेच अकोला बाजारात ०४ हजार २२३ रुपये, अमरावती बाजारात ४ हजार ३९५ रुपये, तर वाशिम बाजारात ४ हजार २५३ रुपये दर मिळाला.

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतीलातूरमार्केट यार्ड