Join us

Soyabean Rate : पुढील पंधरा दिवस म्हणजेच दिवाळी आणि दिवाळीनंतर सोयाबीनचे दर कसे राहतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:40 IST

Soyabean Market : या पुढील पंधरा दिवस म्हणजेच दिवाळी आणि दिवाळीनंतर सोयाबीनचे बाजार भाव कसे राहतील हे पाहुयात... 

Soyabean Market : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आली असून सद्यस्थितीत सोयाबीनला क्विंटलमागे सरासरी ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. 

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून काही भागात सोयाबीन काढणी सुरु आहे. तर काही भागात उरले सुरले सोयाबीन हाताशी लावण्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशातच दिवाळी साजरी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या पुढील पंधरा दिवस म्हणजेच दिवाळी आणि दिवाळीनंतर हे बाजार भाव कसे राहतील हे पाहुयात... 

मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील सप्टेबर महिन्यातील सरासरी किंमती पुढीलप्रमाणे होत्या.ऑक्टोबर २०२२ मध्ये ५०७१ प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२३ मध्ये ४६६० प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२४ मध्ये ४३६९ प्रति क्विंटल ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५१५ रुपये ते ४८९५ रुपये प्रति क्विंटल मिळण्याची शक्यता आहे. 

उत्पादन किती होईल? सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५३२८ प्रति क्विंटल आहे. भारतात मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक कमी दिसून येते. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन ११६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे. 

-  मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी सोयाबीन पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices: Diwali Forecast and Post-Diwali Market Trends Analyzed

Web Summary : Maharashtra farmers face soybean losses. Current rates are ₹3,500-₹4,000/quintal. Expected October 2025 prices range from ₹4,515-₹4,895/quintal. India's soybean production is projected to decrease by 8% this year, impacting market prices.
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डदिवाळी २०२५शेती क्षेत्रशेती