Join us

Soyabean Market : ऑगस्ट 2025 मध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:40 IST

Soyabean Market : मागील तीन वर्षे सोयाबीनचे भाव काय होते, यंदाच्या ऑगस्टमध्ये कसे राहतील, हे पाहुयात....

Soyabean Market : सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४ मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १८.० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील ऑगस्ट महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या. 

यामध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये ६ हजार १४९ रुपये प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२३ मध्ये ४ हजार ८४३ रुपये प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२४ मध्ये ४ हजार ३७१ रुपये प्रति क्विंटल होत्या. तर ऑगस्ट २०२५ मध्ये ४२०० ते ४५१५ रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच एमएसपी पेक्षा कमीच असतील. 

भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक कमी दिसून येते. 

सोयाबीनचे उत्पादन किती होणार? सन २०२३-२४ च्या तुलनेत सन २०२४- २५ मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत ५४ टक्केनी वाढ आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या, अहवालानुसार सन २०२५-२६ मध्ये, जगात ४२७६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १.३ टक्केनी (लाख टन, २०२३-२४) अधिक आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी सोयाबीन पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.  

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती