Join us

Soyabean, Cotton Market : सोयाबीन, कापसाला हमीभाव नाही, शिवाय बाजारभावही नाही, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 20:56 IST

Soyabean, Cotton Market : आता शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकरी बाजारात गेले असता, शेतमालाला भाव नाही.

Soyabean, Cotton Market : खरीप हंगामात (Kharif Season) सततच्या पावसाने उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. आता शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकरी बाजारात गेले असता, शेतमालाला भाव नाही. सोयाबीन, कापसाला (Soyabean Market) योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्हीही पिकांना हमीभाव जाहीर केला असून मात्र बाजारात हमीभाव तर दूरच पण अपेक्षित बाजारभाव (Cotton Market) देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. 

एकीकडे सोयाबीनला 4892 रुपये तर मध्यम स्टेपल कापसाला (Kapus Bajarbhav) 7121 रुपये, लांब स्टेपल कापसाला 7521 रुपये इतकी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्हीही पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. शिवाय शासनाने जाहीर केलेला हमीभाव देखील मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच मिळणाऱ्या बाजारभावापेक्षा उत्पादन खर्चच अधिक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.  सध्या कापसाला 06 हजार पाचशे ते 07 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर सोयाबीनला 03 ते 04 हजारांपर्यंत कमीत कमी दर मिळत आहे. दरवाढीच्या आशेने 50 टक्के कापूस घरातच पडून आहे. साधारण फेब्रुवारी, मार्चपर्यंत बहुतांश शेतकरी कापसाची विक्री करतात. गेल्या वर्षी कापसाचे दर समाधानकारक होते. यावर्षी कापसाचे दर वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस बाजारपेठेत नेला नाही. मात्र अजूनही कापसाला अपेक्षित बाजारभाव नाही. 

आज काय बाजारभाव मिळाला?

आज सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला 07 हजार 250 रुपये तर मध्यम स्टेपल कापसाला हिंगणघाट बाजारात 07 हजार रुपये दर मिळाला. तर आज पिवळ्या सोयाबीनला अकोला बाजारात 04 हजार 150 रुपये, मूर्तिजापूर बाजारात 03 हजार 970 रुपये, तर लातूर बाजार 04 हजार 200 रुपये दर मिळाला.

हेही वाचा : Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक १ लाख क्विंटल पार ; काय मिळतोय दर 

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रमार्केट यार्डसोयाबीनलातूर