Join us

Soyabean Market : मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:13 IST

Soyabean Market : एकीकडे सोयाबीनला ०४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल एमएसपी असताना बाजारात (soyabean rate Down) भाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Soyabean Market :  सोयाबीन काढणी सुरू असल्यापासून ०४ हजार रुपये ते ०४ हजार ३०० रुपयापर्यंत भाव होता आणि आता सोयाबीन (Soyabean Market) काढणी शेवटच्या टप्प्यात असताना देखील हाच भाव असल्याचं चित्र आहे. एकीकडे केंद्र सरकारने सोयाबीनला ०४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केले असताना दुसरीकडे बाजारभाव (soyabean rate Down) समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मागील आठवडाभरात बाजारभाव कसे होते ते सविस्तर पाहूयात...

मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Latur Soyabean Market) सरासरी किंमत रुपये ४ हजार १८६ प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.४ टक्के वाढ झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत .४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयार्बीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती ४२३७ रुपये प्रतिक्विंटल अशा सर्वाधिक होत्या. तर अमरावती बाजारात सरासरी किंमती ३ हजार ९९५ रुपये क्विंटल होत्या.

आजचे सोयाबीन बाजारभाव 

दरम्यान आजचे बाजारभाव पाहिले तर आज पिवळा सोयाबीनला मलकापूर बाजारात ३८०० रुपये, पैठण बाजारात ३८८१ रुपये, बारामती बाजारात ४०८० रुपये, गेवराई बाजारात ०४ हजार रुपये, पुलगाव बाजारात ०४ हजार ५० रुपये, चांदुर रेल्वे बाजारात ०३ हजार ९५० रुपये तर नागपूर बाजारात लोकल सोयाबीनला ०४ हजार १०० रुपये दर मिळाला. 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीलातूर