Join us

Shetmal Market : हरभऱ्याच्या किमतीत उसळी; सरकारचा गहू-तांदळासाठी मोठा निर्णय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:33 IST

Shetmal Market : राज्यातील आणि देशातील बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून साखर, हरभरा यासारख्या कृषीमालाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market)

संजय लव्हाडे

राज्यातील आणि देशातील बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून साखर, हरभरा यासारख्या कृषीमालाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market)

दुसरीकडे, जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गहू व तांदळाच्या विक्रीसाठी ‘ओपन मार्केट सेल स्कीम’ (OMSS) अंतर्गत विक्रीचा निर्णय घेतला आहे.(Shetmal Market)

जालना बाजारात साखर आणि हरभऱ्याच्या किमती उसळी घेत असताना, जागतिक आर्थिक तणावामुळे सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दरवाढ रोखण्यासाठी सरकारने गहू आणि तांदूळ 'ओपन मार्केट सेल' योजनेतून थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. (Shetmal Market)

आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता ही स्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता असून, ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.(Shetmal Market)

साखरेच्या किमतीत झपाट्याने वाढ

मागील दोन-तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे. चालू महिन्याचा विक्री कोटा बहुतांश साखर कारखान्यांचा संपलेला असूनही दरवाढ होत असल्याने यामागे सटोरियांची वाढती चढा-ओढ असल्याचे बोलले जात आहे. येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जालना बाजारभाव (साखर): ४,१०० ते ४,२५० प्रति क्विंटल

हरभऱ्यात तेजी कायम

ऑस्ट्रेलियातून आयात होणाऱ्या हरभऱ्याचे पीक ऑक्टोबरमध्ये येणार असल्यामुळे, सध्या भारतीय बाजारपेठेत मागणी अधिक आहे. परिणामी दर वाढले असून व्यापारी वर्ग हरभऱ्यातील गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहे.

जालना बाजारभाव (हरभरा): ५,२०० ते ६,३१५ प्रति क्विंटल

गहू-तांदळासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गहू आणि तांदळाची विक्री 'ओपन मार्केट सेल स्कीम' (OMSS) अंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दरात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गहू बाजारभाव: २ हजार ५०० ते ५ हजार प्रति क्विंटल

सोन्या-चांदीत मंदीचा माहोल

जागतिक बाजारात चीन-अमेरिका व्यापारी संघर्ष सुरु असल्यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. मागील दोन दिवसांत दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आहेत.

जालना बाजारभाव (सोने): ९८ हजार प्रति तोळाजालना बाजारभाव (चांदी): १ लााख १४ हजार प्रति किलो

अन्य प्रमुख बाजारभाव (प्रतिक्विंटल/किलो)

शेतमाल / वस्तूबाजारभाव (₹)
गहू२,५०० – ५,०००
ज्वारी२,०५० – ३,८५०
बाजरी२,१०० – ३,०००
उडीद६,९११
हरभरा५,२०० – ६,३१५
सोयाबीन३,७०० – ४,४००
साखर४,१०० – ४,२५०
पामतेल१२,८००
सूर्यफूल तेल१४,४००
सरकी तेल१४,५००
सोयाबीन तेल१३,०००

बाजारात सध्या खाद्यतेल, साखर व हरभऱ्याच्या दरात तेजी तर सोन्या-चांदीमध्ये मंदीचा कल आहे. सरकारकडून गहू-तांदूळ स्वस्तात विक्रीसाठी पुढाकार घेतला जात असून आगामी सणासुदीचे दिवस पाहता बाजारात दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात आवक मंदावली; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूभातहरभरा