Join us

Shetmal Bajarbhav : शेतीमाल दर अपडेट: बाजारात तेजीचे वारे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:57 IST

Shetmal Bajarbhav: साखरेचा ऑगस्ट कोटा जाहीर होताच बाजारात मोठी खळबळ उडाली असून सटोरियांच्या हालचालींमुळे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याचबरोबर, उत्पादन घट आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे दरही हळूहळू वधारू लागले आहेत. त्यामुळे बाजारात आता तेजीचे वारे वाहत आहे.(Shetmal Bajarbhav)

संजय लव्हाडे

साखरेचा ऑगस्ट कोटा जाहीर होताच बाजारात मोठी खळबळ उडाली असून सटोरियांच्या हालचालींमुळे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याचबरोबर, उत्पादन घट आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे दरही हळूहळू वधारू लागले आहेत.(Shetmal Bajarbhav)

श्रावण महिन्यातील सणवारांमुळे साखरेच्या दरात आणखी उसळी येण्याची शक्यता आहे, तर सोने-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार सुरूच आहेत.(Shetmal Bajarbhav)

ऑगस्ट महिन्याच्या साखर कोट्याच्या घोषणेनंतर बाजारात साखरेच्या दरांनी झपाट्याने उसळी घेतली आहे. यासोबतच कमी उत्पादनामुळे जुन्या सोयाबीनच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दरही उंचावले आहेत.(Shetmal Bajarbhav)

साखरेला सणांचा आधार

सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा जाहीर केल्यानंतर सटोरिया आणि व्यापाऱ्यांनी बाजारात आपली पकड घट्ट केली. याचा परिणाम म्हणून जालन्यासह राज्यभरातील बाजारात साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

सध्या साखरेचे दर ४ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. यंदा श्रावण महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी यांसारख्या सणांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांकडे आता साखरेचा पुरेसा साठा असून, काही साखर कारखान्यांनीही विक्रीचे दर वाढवले आहेत.

सोयाबीन दरात पूर्वसंकेत; नवीन हंगामाची प्रतिक्षा

खरीपातील नवीन सोयाबीनला अजून दोन महिने आहेत, मात्र सध्या जुन्या सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. मार्च ते मेदरम्यान दर ४ हजार रुपयांखाली घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते. आता हाच साठा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो आहे.

सोनं-चांदीत चढ-उतार, सणामुळे खरेदीला गती

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती, पण शनिवारी पुन्हा तेजी आली. सध्या सोन्याचा दर ९९ हजार ५०० रुपये प्रति तोळा, तर चांदी १ लाख १५ हजार रुपये प्रति किलो इतकी नोंदवली जात आहे.

प्रमुख बाजारभाव

शेतमालदर (प्रति क्विंटल)
गहू२,४०० – ५,०००
ज्वारी२,००० – ३,६५१
बाजरी२,१०० – ३,०००
मका२,२०० – २,२७५
तूर५,००० – ६,७५०
हरभरा५,५०० – ६,२५०
राई६,१०० – ६,७५०

शेतकऱ्यांसाठी टिप 

साखर विक्रीसाठी योग्य वेळ, दर वाढीचा फायदा मिळवण्यासाठी सणासुदीपूर्वीची बाजारपेठ ओळखा.

जुन्या सोयाबीनचा साठा ठेवला असल्यास विक्रीचा योग्य काळ सुरू झाला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Reshim Market : रेशीम कोष विक्रीत बीडचा डंका; एका आठवड्यात कोट्यवधींची उलाढाल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती