नाशिक : रमजान मालेगाव ईदच्या शिरखुर्यासाठी यंदा जास्त मोल मोजावे लागणार आहे. शिरखुर्मा बनवण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून सुकामेव्याची मोठी मागणी आहे. मात्र आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयातीवर परिणाम झाल्याने ड्रायफ्रूट्सच्या किमतीत २० ते ४० टक्के वाढ झाली आहे.
शिरखुर्मा हे दूध, शेवया, साखर आणि सुकामेव्याचे स्वादिष्ट मिश्रण असते. त्यासाठी मुख्यतः बदाम, काजू, पिस्ता, खारीक, मनुका, चारोळी, काही प्रमाणात केशरसह वेलदोडे, लवंग, जायफळ हे घटक वापरले जातात. ते शिरखुर्माला खमंग चव आणि पौष्टिकता देतात. बाजारात शिरखुर्म्याचे तयार किट्सही मिळतात, त्यात हे सर्व जिन्नस असतात.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या शेवया आल्या असून त्यांच्या किमती ९० ते १५० रुपये प्रतिकिलो आहेत. पश्चिम आशिया आणि इराणमधील युद्धाच्या तणावामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. इराण, अफगाणिस्तानमधून येणाऱ्या पिस्ता, बादाम, चारोळीसारख्या ड्रायफ्रूट्सच्या किमतीवर परिणाम झाला. मालेगाव शहरातील पूर्व भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा बनवण्याचा रिवाज आहे.
सध्याचे ड्रायफ्रूटचे दर
- बदाम : ८०० ते १००० रुपये किलो
- काजू : ८०० ते ११०० रुपये किलो
- पिस्ता : २००० ते २५०० रुपये किलो
- खारीक : २०० ते ४०० रुपये किलो
- मनुका : ३५० ते ४७० रुपये किलो
- चारोळी : १४०० ते १८०० रुपये किलो
- खसखस : १६०० ते १८०० रुपये किलो
- मगज : ६०० ते ७२० रुपये किलो
- वेलदोडे : २८०० ते ३४०० रुपये किलो
- खोबरे : ३५० ते ५०० रुपये किलो
- शेवया : ९० ते १२० रुपये किलो
रमजान ईदला मुस्लीम बांधवांकडून सुकामेव्याची मागणी दुप्पट होते. यंदा साठा आहे, पण आखाती देशांतून नव्याने आलेल्या मालाच्या किमती जास्त आहेत. मागील ईदच्या वेळी पिस्ता १२०० व चारोळी १२०० रुपये प्रतिकिलो होती. यंदा मात्र, थोडे जास्त पैसे मोजावे लागत असल्याने काही प्रमाणात आनंद कमी होत आहे.- मोहम्मद नजिमुद्दीम फकीरा शेख, ग्राहक
Web Summary : Dry fruit prices have increased 20-40% due to Middle East tensions impacting imports during Ramadan. Popular items like almonds, cashews, and pistachios are significantly more expensive, affecting traditional dishes like Shirkhurma. Consumers express concern over rising costs.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण रमजान के दौरान आयात प्रभावित होने से सूखे मेवों की कीमतों में 20-40% की वृद्धि हुई है। बादाम, काजू और पिस्ता जैसे लोकप्रिय आइटम काफी महंगे हो गए हैं, जिससे शिरखुर्मा जैसे पारंपरिक व्यंजन प्रभावित हो रहे हैं। उपभोक्ता बढ़ती लागत पर चिंता व्यक्त करते हैं।