Join us

Papai Market : गेल्या हंगामात पपईला 17 ते 18 रुपये भाव होता, यंदा काय भाव मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:55 IST

Papai Market : त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पपईची तोड तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

नंदुरबार : पपईला १० ते १२ रुपये किलो भाव मिळावा, यावर शेतकरी ठाम असताना व्यापाऱ्यांनी अवघा ७ ते ८ रुपये किलोवर अडून राहिल्याने पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यातील बोलणी यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पपईची तोड तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय शहादा येथील बैठकीत घेतला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात २५ हेक्टरवर पपईचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक शहादा तालुक्यात १० ते १५ हजार हेक्टरवर पपई पीक घेतले जाते. विशेषताः अनेक बाजारपेठा शेतकरी तसेच व्यापारी शहादा येथे जाहीर झालेला जो भाव असतो त्या आधारावर ते आपापल्या परिसरात पपई पिकाचे भाव जाहीर करीत असतात. सर्वाधिक मोठे व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी शहादा तालुक्यात ठाण मांडून बसत असतात.

हंगामात दररोज ३०० ट्रका परराज्यात विक्रीसाठी जातात 

गेल्या वर्षों समाधानकारक भाव मिळाला होता. दोन ते तीन वेळा व्यापारी व शेतकरी यांच्यात वाद झाला होता. नंतर मात्र समाधानकारक तोडगा निघून पपईची विक्री झाली होती.

शहादा तालुक्यातील शेतकरी २ गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात पपईची रोपे मागवतात. पपई हंगामात जिल्ह्यातून सर्वाधिक शहादा तालुक्यातून पपईने भरलेल्या दररोज ३०० गाड्या पपईच्या परप्रांतात जात असतात.

पपई खरेदी करणारे सर्वात जास्त 3 व्यापारी उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या हंगामात प्रतिकिलो १७-१८ रुपये भाव होता. आज मात्र व्यापारी केवळ सात ते आठ रुपये प्रतिकिलो भावाने पपई खरेदी करीत आहेत.

व्यापारी वेगवेगळे कारण सांगून पपईचे दर वाढवत नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच शेतकरी संकटात असताना व्यापाऱ्यांनी समन्वयाने समाधानकारक भाव देणे गरजेचे आहे. जोपर्यंत समाधानकारक भाव मिळत नाही तोपर्यंत पपईची तोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून उचल रक्कम घेतली आहे. त्यांना पपईला केवळ ८ रुपये प्रति किलो भाव दिला जातो आहे. जे शेतकरी खुल्या बाजारपेठेत पपई विक्री करतात त्यांना अधिक भाव मिळतो. शेतकऱ्यांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे.- डॉ. प्रफुल्ल पाटील, पपई उत्पादक

English
हिंदी सारांश
Web Title : Papaya Market Prices Plummet; Farmers Halt Harvest Awaiting Fair Rates

Web Summary : Nandurbar papaya farmers halt harvest as traders offer low ₹7-8/kg rates against expectations of ₹10-12. Previous year's rate was ₹17-18/kg. Farmers demand fair prices before resuming supply.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनंदुरबार