Join us

Nagveli pan Market : गणपती बाप्पाचा आशीर्वाद? नागवेली पानांचे दर गगनाला भिडले; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:24 IST

Nagveli pan Market : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागवेली (विड्याचे पान) उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट झाला आहे. यंदा बाजारपेठेत नागवेली पानांना विक्रमी भाव मिळत असून, दर तब्बल दुपटीने वाढले आहेत. गुजरातसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतून वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. (Nagveli pan Market)

यादवकुमार शिंदे 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागवेली (विड्याचे पान) उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट झाला आहे. यंदा बाजारपेठेत नागवेली पानांना विक्रमी भाव मिळत असून, दर तब्बल दुपटीने वाढले आहेत. (Nagveli pan Market)

गुजरातसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतून वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पूजेसाठी लागणाऱ्या नागवेली पानांची बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे. (Nagveli pan Market)

सोयगाव तालुक्यातील पानमळ्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाने गुजरात व महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेत पोहोचत असून, यंदा दर तब्बल दुप्पट झाला आहे. एका बंडलला (५ हजार पाने) २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Nagveli pan Market)

सोयगाव तालुक्यातील पानमळ्यांना यंदा गणेशोत्सवात सुवर्णसंधी लाभली आहे. गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद तसेच महाराष्ट्रातील नागपूर बाजारपेठांत नागवेली पानांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. (Nagveli pan Market)

त्यामुळे एक बंडल (सुमारे ५ हजार पाने) याचा दर तब्बल २ हजार ५०० ते २ हजार ८०० इतका पोहोचला आहे. गेल्या वर्षी हाच दर फक्त १ हजार ४०० होता. म्हणजेच यंदा दरांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.(Nagveli pan Market)

गणेशोत्सवात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठे महत्त्व असते. त्यात नागवेली पानांना मानाचे स्थान आहे. दरवर्षी या सणाच्या काळात मागणी वाढत असते; मात्र यंदा श्रावण महिन्यापासूनच पानांना जोरदार भाव मिळू लागले होते. (Nagveli pan Market)

श्रावणातच दर २ हजार ८०० ते ३ हजारापर्यंत पोहोचले होते, आणि आता गणेशोत्सवात ही तेजी कायम राहिली आहे.

सोयगावची परंपरा; ४० वर्षांचा दबदबा

सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नागवेली पानांचे उत्पादन घेतले जाते. गेली ४० वर्षे या भागाला पानमळ्यांसाठी ओळख आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पानांचे बंडल करून ते गुजरातच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील नागवेली उत्पादनाला राष्ट्रीय स्तरावर मागणी मिळू लागली आहे.

शेतकऱ्यांना समाधान

मागील जून-जुलै महिन्यात केवळ १ हजार ४०० प्रतिबंडल दर मिळत असताना, आज दुपटीहून अधिक म्हणजे २ हजार ५०० ते २ हजार ८०० दर मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. यामुळे तालुक्यातील पानमळे उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

धार्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व

नागवेली पानांना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. गणेशोत्सव, नवरात्र, विजयादशमी, दीपावली यांसारख्या सणांमध्ये या पानांचा पूजेसाठी वापर होतो.

तसेच, ही पाने सर्दी-खोकला कमी करणारी, दमा व श्वसन विकारांवर उपयोगी असल्याचे मानले जाते. उकळून घेतलेला काढा श्वासमार्ग मोकळा करतो, तर लहान मुलांना सर्दी असल्यास छातीवर ठेवलेले कोमट पान औषधासारखे काम करते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागवेली पानांचे दर गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीला सोन्याचा भाव लाभला आहे. परंपरेने जोडलेला हा व्यवसाय आता शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Bajar Bhav : बैलपोळ्यानंतर बाजारात शेतमालाच्या दरात सुधारणा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड