MSP Chana Procurement : हंगाम २०२५ मधील हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणींकरिता ३० मे २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून पत्र काढण्यात आले आहे.
हरभरा खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला नाफेड (NAFED) किंवा एनसीसीएफ (NCCF) यांच्या संकेतस्थळांवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. साधारण १२ मार्चपासून या खरेदी नोंदणीला सुरवात होऊन २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी नाफेडच्या खरेदीपासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
पणन महासंघाच्या पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, हंगाम २०२५ मधील हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढीची मागणी विचारात घेता सदर मुदत दिनांक ३० मे, २०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. हरभरा खरेदीसाठी नोंदणीसाठी तुमच्या जवळच्या कृषी विभागात किंवा नाफेडच्या अधिकृत केंद्राला भेट द्या.
नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड : हे तुमचे ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे.
- जमीन मालकीचे कागदपत्र : जसे की 7/12 उतारा, जो तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून काम करेल.
- बँक खाते तपशील : ज्या खात्यात तुम्हाला हरभऱ्याची रक्कम जमा करायची आहे, त्याचे तपशील आवश्यक आहेत.