Moong, Soybean Bajarbhav : दिवाळीच्या मंगलमय वातावरणात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीच्या शुभारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. (Moong, Soybean Bajarbhav)
पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चना करून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.(Moong, Soybean Bajarbhav)
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती ज्ञानेश्वरराव महल्ले, सदस्य राजीव शर्मा, तसेच नामांकित व्यापारी अशोक गुप्ता, श्रीकिसन अगरवाल, वसंत बाच्छुका, ओम गोयंका, मनीष केडिया, पंकज बियाणे, शंकरलाल बियाणी, प्रकाशराव लहाने, रावसाहेब राहणे, संदीप चौखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.(Moong, Soybean Bajarbhav)
मुहूर्ताच्या सौद्यात अकोला बाजार समितीत दरांचा खास जलवा पाहायला मिळाला. प्रसाद या फर्ममार्फत गोरेगाव येथील शेतकरी रामचंद्र शेगोकार यांच्या मुगाला प्रति क्विंटल ७ हजार १११ रु. इतका विक्रमी दर मिळाला. ही खरेदी श्रीवल्लभ या व्यापाऱ्यांनी केली. त्याचप्रमाणे शेतकरी संतोष किसनराव गवई यांच्या सोयाबीनला रोशन दयाल एनर्जी या फर्मकडून ५ हजार १११ रु. प्रति क्विंटल दर मिळाला.(Moong, Soybean Bajarbhav)
शुभमुहूर्तानंतर लगेचच बाजारातील नियमित खरेदी-विक्री व्यवहारास प्रारंभ झाला असून सर्व व्यापारी आणि अडते यांच्या उपस्थितीत व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. (Moong, Soybean Bajarbhav)
बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याने धान्य व इतर शेतमाल विक्रीस आणताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजार समितीच्या परिसरात दिवाळीचा उत्साह आणि कृषी व्यापाराची हलचल दोन्हींचा सुंदर संगम दिसून आला. शुभमुहूर्तावर उच्च भावाने सुरू झालेली ही खरेदी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे.
Web Summary : Akola market saw enthusiastic Diwali grain purchases. Moong fetched ₹7,111/quintal, soybean ₹5,111/quintal. Farmers are advised to protect crops from predicted rain. Trade is ongoing.
Web Summary : अकोला बाजार में दिवाली पर अनाज की खरीदारी उत्साहपूर्वक हुई। मूंग ₹7,111/क्विंटल, सोयाबीन ₹5,111/क्विंटल में बिका। किसानों को बारिश से फसल बचाने की सलाह दी गई। व्यापार जारी है।