Moong Market Update : सरलेल्या गणेशोत्सव, पावसाने दिलेली उघडीप आणि सलग सुट्ट्यांनंतर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी (८ सप्टेंबर) व्यापाराला गती मिळाली. (Moong Market Update)
येथील बाजारात एकूण ६७६ क्विंटल धान्याची आवक झाली. यामध्ये मुग, हरभरा, ज्वारी, उडद, गहू, सोयाबीन व बाजरी यांचा समावेश होता. मुगाने तब्बल ८ हजार ५० रुपयांचा उच्चांक गाठत शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसले.(Moong Market Update)
मुगाला भाव चढता, सोयाबीन 'जैसे थे'
सोमवारी (८ सप्टेंबर) रोजी मुगाची ५२.५० क्विंटल आवक झाली. भाव ३ हजार ५०१ ते ७ हजार ७०० रुपये मिळाला. सरासरी भाव ५ हजार ५८९ रुपये होता. बुधवारी किमान ४ हजार २०० ते कमाल ८ हजार ५० रुपये भाव मिळाला.
सोमवार, मंगळवारी सोयाबीनची एकूण आवक १६.५० क्विंटल झाली. भाव मात्र ३ हजार ७०० ते ४ हजार ३५० रुपये मिळाला.
उडदात घसरण
मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी उडदाची ८० क्विंटल आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ४०० रुपयांनी दर घसरले. बुधवारी उडदाला ५ हजार ७३६ रुपये भाव मिळाला. मुगाची ३३.५० क्विंटल आवक झाली. ४ हजार ९०० किमान, तर कमाल भाव ७ हजार ९५० रुपये मिळाला. सोमवारच्या तुलनेत मुगाला ५०० रुपयांचा जादा भाव मिळाला. तर बुधवारी ८ हजार ५० रुपयांचा भाव मिळाला
हरभरा दरात घसरण
मागील तीन दिवसांत केवळ ९ क्विंटल आवक झाली.
दर : किमान ५ हजार रुपये ते कमाल ६ हजार ९८१ रुपये
सरासरी भाव : ६ हजार ३४ रुपये
मंगळवार व बुधवारी दर घसरून ५ हजार ४०० रुपये पर्यंत पोहोचला.
ज्वारी, गहू, बाजरी दर
ज्वारी : १७३ क्विंटल आवक, भाव १ हजार ९०० ते ३ हजार ३०० रुपये
उडद : १५७ क्विंटल आवक, सोमवारच्या तुलनेत दर ४०० रुपयांनी घसरून बुधवारी ५ हजार ७३६ रुपये
गहू : १४४ क्विंटल आवक, भाव २ हजार ३०० ते २ हजार ९३६ रुपये
बाजरी : भाव १ हजार ९०० ते २ हजार ९५१ रुपये दर्जानुसार
बाजारातील चित्र
सलग सुट्ट्या संपल्यानंतर आवक वाढली, मात्र, मंगळवार (२५६ क्विंटल) व बुधवार (२३३.५० क्विंटल) रोजी आवक पुन्हा घटली.
मुगामध्ये सततची तेजी दिसून आली, तर हरभऱ्याच्या दराने निराशा केली.
उडदात घट, तर ज्वारी व गव्हाच्या भावात स्थिरता पाहायला मिळाली.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागणी वाढल्याने मुगाच्या दराने ८ हजारांचा टप्पा गाठला, तर हरभऱ्याची आवक कमी असून दर घसरले आहेत. पुढील काही दिवसांत पावसाचा प्रभाव आणि सणासुदीची मागणी लक्षात घेता बाजारभावात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Farmers Crisis : कापूस उत्पादकांच्या अडचणी समजणार कोण? वाचा सविस्तर