Join us
Daily Top 2Weekly Top 5

Moong Market : उन्हाळी मुग बाजारात दाखल; तेजी की मंदी? वाचा नेमका ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:29 IST

Moong Market : उन्हाळी मुग बाजारात दाखल होताच सुरुवातीला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, अवघ्या काही दिवसांतच दरात घसरण झाल्याने बाजारातील स्थिती पुन्हा अनिश्चित झाली आहे. वाढती आवक आणि बदलते बाजाराचे गणित यामुळे पुढील काळात मुगाच्या दराचा ट्रेंड काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Moong Market)

वाशिम : यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेला उन्हाळी मूग आता बाजारात दाखल होत असून, सुरुवातीला या पिकाला समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र दिसून आले.(Moong Market)

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मुहूर्ताच्या दिवशी सोमवारी मुगाला प्रतिक्विंटल तब्बल ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अवघ्या चार दिवसांतच दरात घसरण झाल्याने पुन्हा एकदा चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.(Moong Market)

नियोजनापेक्षा कमी पेरणी, तरी उत्पादन समाधानकारक

जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी सुमारे ८,७१२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ६२८८.८८ हेक्टरवरच पेरणी झाली. त्यामध्ये उन्हाळी मुगाचा मोठा वाटा आहे.

अपेक्षित २७५८.२१ हेक्टरच्या तुलनेत २३२४.१० हेक्टरवर मुगाची लागवड झाली असून, हे प्रमाण सुमारे ८४.२६ टक्के आहे.

मधल्या काळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काही भागातील पिकांना फटका बसला होता. तरीही अनेक ठिकाणी उत्पादन चांगले येत असल्याने बाजारात नव्या मुगाची आवक सुरू झाली आहे.

मुहूर्ताला ७ हजारांचा दर, चार दिवसांत घसरण

वाशिम बाजार समितीत सुरुवातीला सुमारे २० क्विंटल मुगाची आवक झाली होती. या मालाला किमान ५,४७० रुपये ते कमाल ७,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मात्र, गुरुवारी हा दर घसरून सुमारे ६,२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला. सध्या दररोज जवळपास २० क्विंटल मुगाची आवक होत आहे.

जुन्या मुगापेक्षा नव्या मुगाला अधिक दर

बाजार समित्यांमध्ये खरीप हंगामातील जुन्या मुगाचीही खरेदी सुरू आहे. मात्र, त्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसते.

जुन्या मुगाला कमाल ५,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना, नव्या उन्हाळी मुगाला सुरुवातीला किमान हजार रुपयांनी अधिक दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.

पुढील काळात दरावर दबाव वाढण्याची शक्यता

सध्या बाजारात मुगाची आवक हळूहळू वाढत असून, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर माल दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ बिघडल्यास दरावर आणखी दबाव येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांसमोर पुन्हा अनिश्चितता

सुरुवातीला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती. मात्र अल्पावधीतच झालेली दरघसरण पाहता, पुढील काळात भाव टिकतील की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे मुग विक्रीचा योग्य वेळ साधणे, हेच सध्या शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dhanya Bajarbhav : आखाती युद्धाचा थेट परिणाम; सोयाबीन-तूर तेजीत, गव्हातही सुधारणा वाचा सविस्तर

अधिक वाचा : Gahu Bajarbhav : शरबती गहू झाला सुपरहिट; बाजाराचा नेमका ट्रेंड काय? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Moong Arrival: Summer Moong Enters Market; Boom or Bust?

Web Summary : Summer moong arrivals in Washim market initially saw good prices, reaching ₹7,000/quintal. However, prices soon declined, causing farmer concern. Despite lower planting, production is satisfactory. Market arrivals are increasing, raising fears of price pressure. Farmers face uncertainty navigating sales.
टॅग्स :शेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड