Moong Market : राज्यात मुगाच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आवक कमी असून दर्जेदार मुगाला उच्च भाव मिळत आहेत. अकोला, जालना, मुंबई, सांगली यांसारख्या बाजारांत हिरवा, चमकी आणि लोकल मुगासाठी वेगवेगळे भाव नोंदवले गेले. (Moong Market)
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी मुगाला सरासरी ४ हजार ४०० दर मिळाला. आवक केवळ ३२ क्विंटल होती. यंदा उशिराने पाऊस सुरू झाल्याने मुगाचा पेरा घटला. (Moong Market)
ज्या शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली; परंतु अतिवृष्टीमुळे मुगाचे नुकसान झाले आहे यामुळे बाजारात मुगाची आवक घटली आहे. मुगाला जास्तीत जास्त दर ५ हजार ५०५ रुपये तर कमीत कमी ४ हजार ३०० रुपये दर मिळाला.(Moong Market)
हिरवा मुग
अकोला, दुधणी, नांदगाव, मुरुम येथे हिरव्या मुगाची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
गुणवत्तापूर्ण हिरवा मुग ८ हजार रुपयांपर्यंत विकला गेला, तर मध्यम दर्जाच्या मुगाला ४ हजार ३०० ते ६ हजार ५०० रुपये दर मिळाले.
चमकी मुग
जालना, मलकापूर, शिरपूर येथे चमकी मुगाला चांगली मागणी.
जालना व मलकापूर बाजारात या जातीला उच्च दर मिळाले
जालना येथे ९ हजार १००, तर मलकापूर येथे १० हजार २५ रुपये प्रति क्विंटल.
लोकल मुग
मुंबई व सांगली बाजारात लोकल मुगाला सर्वाधिक दर.
मुंबईत लोकल मुग ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचला, तर सांगलीत सरासरी ९ हजार १८५ रुपये दर मिळाला.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मुगाची आवक (Moong Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
प्रमुख बाजारांतील मुग भाव (18/09/2025)
बाजार | जात | आवक (क्विंटल) | किमान दर (₹) | कमाल दर (₹) | सरासरी दर (₹) |
---|---|---|---|---|---|
अकोला | हिरवा | 32 | 4,300 | 5,505 | 4,400 |
जालना | चमकी | 242 | 4,500 | 9,100 | 9,100 |
मुंबई | लोकल | 566 | 8,800 | 11,000 | 10,000 |
सांगली | लोकल | 125 | 8,770 | 9,600 | 9,185 |
मलकापूर | चमकी | 6 | 4,900 | 10,025 | 10,025 |
दुधणी | हिरवा | 350 | 2,500 | 8,900 | 8,900 |
नांदगाव | हिरवा | 40 | 8,768 | 9,701 | 8,768 |
मुरुम | हिरवा | 112 | 6,320 | 7,800 | 7,060 |
शिरपूर | चमकी | 120 | 4,000 | 8,811 | 8,811 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)