Join us

Agriculture News : मागील आठवड्यात तूर, सोयाबीन, कापूस, कांदा बाजार कसे राहिले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:57 IST

Agriculture News : मागील आठवड्यात राज्यातील निवडक शेतमालाला काय बाजारभाव (Market Yard) मिळाले हे पाहुयात.

Market Update News : मागील आठवड्यातील शेतमालाचे बाजारभाव (Market Update) पाहिले असता मका दर घसरले तुरीचे दरात समाधानकारक वाढ, सोयाबीन दरात घसरण (Soyabean Rate) सुरूच आहे. कापूस बाजारात देखील घसरण सुरूच आहे. दुसरीकडे कांदा बाजार भाव चढ-उतार दिसून येत आहे. टोमॅटो बाजार भाव पूर्णतः घसरले आहेत. तर हळद बाजार भाव देखील घसरले आहेत.

बाजार माहिती व जोखीम निवारण कक्ष यांच्या अधिकृत माहितीनुसार मागील आठवड्यात राज्यातील निवडक शेतमालाला काय बाजार भाव मिळाले हे पाहुयात. मागील आठवड्यात मक्याला (Maize Market) नांदगाव बाजारात सरासरी 2240 रुपये तर हरभऱ्याला लातुर बाजारात 6 हजार 90 रुपये, तूरीला लातुर बाजार 7325 रुपये दर मिळाला.

तर सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच असून लातूर बाजारात मागील आठवड्यात 04 हजार 100 रुपये असा सरासरी भाव मिळाला. राजकोट बाजारात कापसाला सात हजार 191 रुपये, लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी 2396 रुपये, पुणे बाजारात टोमॅटोला सरासरी 860 रुपये, तर हिंगोली बाजारात हळदीला सरासरी 12 हजार 641 रुपये दर मिळाला. 

अशा पद्धतीने शेतमालाच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहेत राज्यातील महत्त्वाची पीक असलेल्या तूर, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांना देखील बाजारभावाचा फटका दिसून येत आहे.

टॅग्स :मार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीबाजार