लातूर : नवीन वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या भरभराटीची व्हावी, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लातूरबाजार समितीत (Latur APMC Market) येथे मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी आणला. (Latur APMC Market)
गुरुवारी (१९ मार्च) रोजी बाजार समितीत तब्बल ३२ हजार क्विंटलहून अधिक आवक (Arrival) नोंदविण्यात आली असून, सोयाबीन, हरभरा, तूर आणि चिंच या पिकांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.(Latur APMC Market)
सोयाबीनची सर्वाधिक आवक
या दिवशी सर्वाधिक आवक सोयाबीनची झाली. सुमारे १४,३७२ क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाले असून, त्याला सरासरी ५,३५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
त्यानंतर हरभऱ्याची ८,९५१ क्विंटल आवक झाली असून, त्याला ५,२०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
तूर बाजारात तेजी
तूर बाजारातही तेजी कायम असून, ३,५१७ क्विंटल आवक झालेल्या तुरीला ७,८५० रुपये प्रति क्विंटल असा चांगला दर मिळाला. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नवीन गव्हाची आवक सुरू
रब्बी हंगामातील नवीन गव्हाची आवकही सुरू झाली असून, १,७२१ क्विंटल गव्हाला २,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. करडईचीही आवक सुरू झाली आहे.
चिंचेने वेधले लक्ष
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चिंचेने सर्वांचे लक्ष वेधले. सुमारे ८९५ क्विंटल आवक झालेल्या चिंचेला सरासरी ११,६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर कमाल दर १५ हजार रुपयांपर्यंत गेला. बाहेरील बाजारपेठेतील मागणीमुळे चिंचेच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इतर शेतीमालाचे दर (प्रति क्विंटल)
राजमा : १,४४७ क्विंटल – ७,१०० रु.
गुळ : ४७९ क्विंटल – ४,००० रु. पेक्षा अधिक
करडई : २९९ क्विंटल – ५,००० रु.
ज्वारी : १२७ क्विंटल – ४,९०० रु. (५ हजारांच्या उंबरठ्यावर)
बाजारात गर्दी, मजुरांची धावपळ
मोठ्या प्रमाणातील आवकामुळे बाजार समितीत व्यापारी, शेतकरी आणि मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भरउन्हातही चाळणी आणि विक्री प्रक्रिया सुरू असल्याने बाजारपेठ गजबजलेली दिसत होती.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लातूर बाजार समितीत झालेली विक्रमी आवक आणि मिळालेले चांगले दर यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ठरत आहे.
काही पिकांना चांगले दर मिळत असले तरी बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन पुढील काळातही दर स्थिर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : Tur Bajarbhav : तूर ८ हजाराच्या उंबरठ्यावर ; ‘या’ ठिकाणी अजूनही कमी दर
Web Summary : Latur APMC market witnessed record arrivals on Gudi Padwa, with soybean leading. Farmers saw good prices for soybean, gram, and tur. Chinch fetched up to ₹15,000/quintal. High market activity marked a positive start to the new year for farmers.
Web Summary : गुड़ी पड़वा पर लातूर APMC बाजार में रिकॉर्ड आवक हुई, जिसमें सोयाबीन सबसे आगे रहा। किसानों को सोयाबीन, चना और तुवर के अच्छे दाम मिले। चिंच की कीमत ₹15,000/क्विंटल तक रही। बाजार की उच्च गतिविधि किसानों के लिए नए साल की सकारात्मक शुरुआत है।