Join us

Lasun Market : यंदा लसूण लागवड करताय ना? लसूण झाला दहा हजारी, वाचा देशभरातील दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:55 IST

Lasun Market : गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील लसूण उत्पादक शेतकरी (Lasun Farmers) घसरत्या किमतीमुळे खूप नाराज होते.

Lasun Market : गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील लसूण उत्पादक शेतकरी (Lasun Farmers) घसरत्या किमतीमुळे खूप नाराज होते. परंतु जूनच्या तिसऱ्या आठवड्यात लसूणच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यंदा लसूण लागवडीतून नफा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रातील हिंगणा धान्य बाजारात 16 जून रोजी लसणाला  (Maharashtra Lasun Market) किमान किंमत 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळाली. अशा परिस्थितीत, आता लसूण उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, मंडईंमध्ये समाधानकारक दरांमुळे शेतकरी आनंदी आहेत. महाराष्ट्रासह देशातील इतर मंडईंमध्ये लसूणचा नवीनतम बाजारभाव काय आहे ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील आजचे लसूण बाजार भाव पाहिले असता राहता बाजारात सर्वसाधारण लसणाला कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 05 हजार रुपये, पुणे बाजारात लोकल लसणाला कमीत कमी 03 हजार 500 रुपये, तर सरासरी 07 हजार रुपये पुणे मोशी बाजारात सरासरी 08 हजार रुपये, भुसावळ बाजारात 6 हजार 500 रुपये दर मिळाला. तर सर्वाधिक दर हा छत्रपती संभाजीनगर बाजारात सरासरी 10 हजार 500 रुपये इतका मिळाला. 

देशातील इतर बाजारातील स्थिती पाहिली असता हरियाणा राज्यातील शहाबाद बाजारात कमीत कमी दोन हजार रुपये, सरासरी 05 हजार रुपये, नारनौल बाजारात सरासरी 06 हजार रुपये, हिमाचल प्रदेशातील कांगडा बाजारात सरासरी 10 हजार 500 रुपये, तर गुजरात राज्यातील वधवान बाजारात सर्वाधिक 11 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच उत्तर प्रदेशातील मैंगलगंज या बाजारात सरासरी 2660 रुपये, बाराबँकी बाजारात सरासरी 6 हजार 600 रुपये, मध्य प्रदेशातील टीमरनी बाजारात सरासरी 3000 रुपये आणि रतलाम बाजारात सरासरी 7 हजार 101 रुपये दर मिळाला. देशातील इतर बाजारपेठांमध्येही लसणाचे भाव वाढत आहेत. हिमाचलमधील कांगडा येथे किमान भावही प्रति क्विंटल ११००० रुपये झाला आहे. तर गुजरातमधील वाढवान येथे कमाल भाव १२ हजार रुपयापर्यंत पोहचले आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेती