Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapus Market : चालू डिसेंबर महिन्यात कापसाचे सरासरी दर कसे राहतील, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:15 IST

Kapus Market : डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी कापूस पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

Kapus Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किमत ७ हजार ७१० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. या डिसेंबर महिन्यात कापसाचे सरासरी दर काय राहतील, याबाबत अंदाज वर्तविण्यात आला आहे, ते पाहुयात... 

मागील तीन वर्षातील अकोला बाजारातील कापसाच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी किमती पुढील प्रमाणे.

  • डिसेंबर २०२२ मध्ये ८४४९ रुपये प्रति क्विंटल
  • डिसेंबर २०२३ मध्ये ६९११ रुपये प्रति क्विंटल 
  • डिसेंबर २०२४ मध्ये ७१४५ रुपये प्रति क्विंटल

तर डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार ११० रुपये ते ७ हजार ६१५ रुपये प्रति क्विंटल राहतील.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १४.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशात चालू वर्षीच्या ऑक्टोबर २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या ऑक्टोबर २०२४ च्या तुलेनत ३३.४५ टक्क्यांनी घटली आहे.

USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पावन २५.४ दशलक्ष ४८० lb bales आहे., शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षे मुळे पेरणी केलेल्या १२.४ वशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी कापूस पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

 

Read More : मक्याला तीन वर्षांत सरासरी 2 हजारांचा दर मिळाला, 'या' डिसेंबरमध्ये कसे दर राहतील?

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Market: December Price Forecast and Market Analysis

Web Summary : Medium staple cotton MSP fixed at ₹7,710. Akola market saw prices between ₹6,911-₹8,449 in recent Decembers. Forecast for December 2025: ₹7,110-₹7,615. Cotton production expected to rise 14.75% in 2024-25, but acreage may decrease.
टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती