Join us

Kapus Kharedi : भोकरदनमध्ये विक्रमी कापूस खरेदी; यंदा 'नोंदणीशिवाय हमीभाव नाही' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:23 IST

Kapus Kharedi : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा कापूस हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्षी भोकरदन बाजार समितीत तब्बल ३.४३ लाख क्विंटल कापूस खरेदी होऊन २५५ कोटींचा विक्रमी व्यवहार झाला होता. यंदा केंद्र सरकारने कापसाला तब्बल ८ हजार ११० हमीभाव जाहीर केला असला, तरी ऑनलाइन नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना हा दर मिळणार नाही.(Kapus Kharedi)

Kapus Kharedi : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा कापूस हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्षी भोकरदन बाजार समितीत तब्बल ३.४३ लाख क्विंटल कापूस खरेदी होऊन २५५ कोटींचा विक्रमी व्यवहार झाला होता. (Kapus Kharedi)

यंदा केंद्र सरकारने कापसाला तब्बल ८ हजार ११० हमीभाव जाहीर केला असला, तरी ऑनलाइन नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना हा दर मिळणार नाही. (Kapus Kharedi)

मात्र, यंदा कापूस लागवडीत घट दिसून येते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपद्वारे १ ते ३० सप्टेंबरदरम्यान नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे प्रशासन व बाजार समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.(Kapus Kharedi)

केंद्र सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी कापसाचा हमीभाव ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ‘कपास किसान’ हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Kapus Kharedi)

शेतकऱ्यांनी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ॲपवर नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना सीसीआयमार्फत हमीभाव योजनेतून कापूस विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. हे ॲप ३० ऑगस्टपासून गुगल प्ले स्टोअर व ॲपल स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.(Kapus Kharedi)

मागील वर्षी विक्रमी खरेदी

मागील हंगामात भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तब्बल ३.४३ लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी झाली. या खरेदीमुळे तब्बल २५५ कोटी ३८ लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. भारतीय कापूस निगममार्फत ही खरेदी करण्यात आली होती, अशी माहिती बाजार समितीचे सचिव संतोष ढाले यांनी दिली.

नोंदणीसाठी अटी व शर्ती

शेतकऱ्यांकडे ई-पीक पाहणी पूर्ण केलेली असावी.

सातबाऱ्यावर कापसाची नोंद असणे बंधनकारक.

आधारकार्ड, बँक खात्याशी आधार लिंक आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.

पोस्टल बँकेचे खाते असल्यास त्याची ट्रान्झॅक्शन मर्यादा वाढवावी लागणार.

कापूस लागवडीत घट

मागील वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड झाली होती. मात्र, अपेक्षित दर न मिळाल्याने यंदा केवळ २७ हजार ५९४ हेक्टर क्षेत्रावरच कापूस लागवड झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी आवाहन

शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन कृउबा सभापती कोतीकराव जगताप यांनी केले.

कापूस विक्रीपूर्वी सातबाऱ्यावर लागवडीची नोंद आवश्यक आहे.

अद्याप नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा नोंदणी अडचणीत येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

परतूरमधील शेतकऱ्यांना सूचना

परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही शेतकऱ्यांना नोंदणीशिवाय कापूस विक्री शक्य नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सभापती राहुल लोणीकर, उपसभापती संभाजी वारे, सचिव आर. बी. लिपने आणि सीसीआय केंद्राचे प्रभारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान अॅपवर नोंदणी करूनच विक्री करावी.

गेल्या वर्षी विक्रमी खरेदी झाल्यानंतर यंदाही शेतकरी हमीभावावर कापूस विकू शकतील. मात्र, यासाठी 'कपास किसान' ॲपवर नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयमार्फत हमीभाव मिळणार नाही.

हे ही वाचा सविस्तर : CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीजालना