Join us

Kapus Kharedi : दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात; शुभारंभीच दरात वाढ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 09:40 IST

Kapus Kharedi : लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. अतिवृष्टी आणि लागवडीत झालेली घट यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाडसावंगी येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला प्रतिक्विंटल तब्बल ९ हजार रुपये इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पांढऱ्या सोन्याला यंदा चांगली चकाकी येण्याची चिन्हे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Kapus Kharedi)

दरवाढीमागील कारणे

यावर्षी राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तसेच, दरवर्षीच्या तुलनेत लागवडीचे क्षेत्रही कमी झाले. उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.(Kapus Kharedi)

खाजगी व्यापाऱ्यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान झाले असले तरी पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. (Kapus Kharedi)

शेतकऱ्यांच्या अपेक्षा

सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागातील कापूसपिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बाजारात चांगला दर मिळणे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे आहे. शेतकऱ्यांना पुढील काळात दर आणखी वाढतील अशी आशा आहे.(Kapus Kharedi)

कार्यक्रमात उपस्थिती

खासगी व्यापाऱ्यांच्या या खरेदी उपक्रमाच्या वेळी सुदाम पवार, प्रमोद भालेराव, अनिल पडुळ, भाऊसाहेब पडुळ, विलास दाभाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 

लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीला झालेला शुभारंभ हा शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने या हंगामात कापसाला चांगली किंमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : High-density Cotton Cultivation : कपाशीची नवी क्रांती : विदर्भात अतिघनता लागवडीचे प्रयोग यशस्वी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton purchase begins on auspicious Dussehra, fetching ₹9,000 per quintal.

Web Summary : Cotton purchases started on Dussehra with rates at ₹9,000 per quintal. Reduced cultivation and excessive rainfall are expected to increase cotton prices. Farmers anticipate good returns due to flood damage. Private traders told Lokmat prices are likely to rise.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड