Kapus Kharedi : केंद्र सरकारने हमी दराने कापूस खरेदीसाठी दिलेल्या मुदतवाढीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Kapus Kharedi)
यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांसह गावपातळीवरील खेडा खरेदीतही कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत.(Kapus Kharedi)
गेल्या महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील बाजारात कापसाला हमी दराच्या आसपास चांगला भाव मिळत होता. खासगी व्यापारी तसेच गावपातळीवरील खेडा खरेदीत कापूस प्रति क्विंटल सुमारे ८ हजार ५०० रुपयांपर्यंत विकला जात होता. मात्र त्यानंतर अचानक बाजारातील मागणी घटल्याने कापसाच्या दरात घसरण सुरू झाली.(Kapus Kharedi)
सध्या बाजारात कापसाला केवळ ७ हजार ते ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळत असल्याचे चित्र आहे.(Kapus Kharedi)
दर घसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवून तो घरातच साठवून ठेवला आहे. दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी योग्य संधीची वाट पाहत आहेत.(Kapus Kharedi)
अशातच कापूस महामंडळ (CCI) मार्फत हमी दराने कापूस खरेदीची मुदत २७ फेब्रुवारीला संपुष्टात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून हमी दराने खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत हमी दराने कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजारातील सध्याच्या कमी भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आता हमी दराने कापूस विकण्यासाठी सीसीआयच्या खरेदी केंद्रांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील हमी दराच्या केंद्रांवर कापसाची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या जिल्ह्यात सीसीआयमार्फत नऊ खरेदी केंद्रांवर हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे. यामध्ये चिखलगाव, बोरगावमंजू, अकोट-१, अकोट-२, चोहोट्टा बाजार, तेल्हारा, पारस, बार्शिटाकळी आणि मूर्तिजापूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर शेतकरी कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.
सरकारने दिलेल्या या मुदतवाढीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, बाजार समित्यांसह खासगी खरेदीतही पुढील काळात कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील कापूस बाजाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : स्लॉट संपले, केंद्र बंद; कापूस विक्री ठप्प वाचा सविस्तर
Web Summary : Cotton farmers get relief as the government extends the purchase deadline. Prices may rise in markets. Farmers who hoarded cotton now have renewed hope as CCI continues purchases at support prices until March 15th. Increased arrivals are expected at purchase centers.
Web Summary : सरकार द्वारा खरीद की समय सीमा बढ़ाने से कपास किसानों को राहत मिली है। बाजारों में कीमतें बढ़ सकती हैं। जिन किसानों ने कपास का भंडारण किया है, उन्हें अब नई उम्मीद है क्योंकि सीसीआई 15 मार्च तक समर्थन मूल्य पर खरीद जारी रखेगा। खरीद केंद्रों पर आवक बढ़ने की उम्मीद है।