Join us

Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:30 IST

Kapus Bajarbhav : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते.

Kapus Bajarbhav :  मागील तीन वर्षातील राजकोट बाजारातील कापसाच्या (Kapus Bajar Bhav) मे महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर मे २०२२ रुपये ११ हजार ८०४ रुपये प्रति क्विंटल, मे २०२३ रुपये ७ हजार ५८७ प्रति क्विंटल, मे २०२४ रुपये ७ हजार ३६१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदाच्या मे २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार २०० ते ७ हजार ८०० प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची (Cotton Market) किमान आधारभूत किंमत (MSP) रु. ७१२१ प्रत्ति क्विटल इतकी जाहीर करण्यात आली आहे. कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५ टक्के वाटा भारताचा आहे.

Tur Market : पुढील वीस दिवस तुरीचे प्रति क्विंटल दर कसे राहतील? वाचा सविस्तर

राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी ६ टक्के वाढ झाली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १०.७३ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

गाठी घटण्याचा अंदाज २०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. देशात चालू वर्षीच्या मार्च २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या मार्च २०२४ च्या तुलेनत २१.२० टक्क्यांनी वाढली आहे.

टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती