Kanda Market : एकीकडे कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, दुसरीकडे अवकाळी पावसाने घातलेले थैमान यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा कांदा (Farmer Onion Market) माल थेट विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थोडा फार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी (Farmers Kanda market) संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या शहरांमध्ये तसेच भारतातील सर्व राज्यांमध्ये आणि कांद्याची मागणी आहे. या सर्व ठिकाणांसह तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये थेट कांदा विक्री व्यवस्था उभारण्याची पुर्वतयारी सुरू केली आहे.
हे पहा : https://www.facebook.com/LokmatAgro/videos/2125529081249554
प्रायोगिक तत्त्वावर पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून थेटपणे शेतकऱ्यांचा कांदा कोणत्याही मध्यस्थांशिवाय विक्री करण्याचे नियोजन केले आहे.
हा नंबर सेव्ह करा..
राज्यातील जे जे शेतकरी थेट कांदा विक्री करण्यास उत्सुक असतील, त्यांनी कांदा संघटनेच्या 7798186487 हा नंबर "कांदा संघटना" या नावाने सेव्ह करून याच नंबरवर आपली संपूर्ण माहिती व्हाट्सअप मेसेज करून पाठवावी, असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
कांदा विक्रीची सध्याची बाजार समितीतील व जागेवरील कांदा विक्रीची प्रचलित पद्धत ही शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे. देशांतर्गत व विदेशात कांद्याची मागणी असलेल्या समोरील ग्राहकांचा खरा दर शेतकऱ्यांना समजत नाही. थेट विक्रीचे जाळे निर्माण केल्यास देशातील व देशाबाहेरील ग्राहकांना हवा असलेला कांदा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दराने विकणे सोपे होणार आहे. - भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना