Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीला प्रति क्विंटल 2900 रुपयांचा विक्रमी दर, कुठे मिळाला दर, वाचा सध्याचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:45 IST

Jwari Market : रब्बी हंगामातील ज्वारीला विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Jwari Market : पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील ज्वारीला विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १० रोजी झालेल्या लिलावात ज्वारीला तब्बल २९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने ज्वारी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी ज्वारीला सरासरी २२०० ते २४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र यावेळी चांगल्या प्रतीच्या ज्वारीसाठी व्यापाऱ्यांकडून स्पर्धात्मक बोली लागल्याने दरात लक्षणीय वाढ झाली. परिणामी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

शेतकरी आपला शेतीमाल बाजारात आणल्यानंतर तातडीच्या आर्थिक गरजांमुळे लगेच विक्री करतो. अनेकदा हंगामाच्या सुरुवातीला कमी दर मिळाल्याने त्याचे नुकसान होते. मात्र पारोळा बाजार समितीने यावेळी दक्षता घेत शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरवाढीमुळे ज्वारी उत्पादकांना जीव भांड्यातज्वारीला मिळालेल्या या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर योग्य दर मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या निर्णयामुळे बाजार समितीबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक दिवस योग्य दराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना ज्वारीला मिळालेल्या दरामुळे आशा निर्माण झाल्या असून त्यामुळे पुढील काही दिवसात बाजार समितीत या विक्रमी दराने ज्वारीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.

बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे. चांगल्या प्रतीच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- दीपक पाटील, सचिव, बाजार समिती, पारोळा

English
हिंदी सारांश
Web Title : Record Price for Sorghum: ₹2900/Quintal in Parola Market

Web Summary : Parola market saw record ₹2900/quintal price for sorghum, delighting farmers. Good quality and market efforts led to the price surge. Farmers are hopeful for continued high prices.
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती