Jwari Market : आज २० एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची १० हजार ७०८ क्विंटलची आवक झाली. यामध्ये मुंबई मार्केटमध्ये ६५६ क्विंटल जालना मार्केटमध्ये १८३७ क्विंटल, तर जळगाव मार्केटमध्ये सर्वाधिक ३१०० क्विंटलची आवक झाली.
यामध्ये जालना मार्केटमध्ये शाळू ज्वारीला कमीत कमी २२०० रुपये तर सरासरी ३६०० रुपये आणि देऊळगाव राजा मार्केटमध्ये कमीत कमी ०२ हजार रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाला.
माजलगाव मार्केटमध्ये रब्बी ज्वारीला सरासरी २५०० रुपये, दुधनी मार्केटमध्ये पांढऱ्या ज्वारीला सरासरी २३२५ रुपये, तुळजापूर मार्केटमध्ये ०४ हजार रुपये, चाळीसगाव मार्केटमध्ये २०२५ रुपये तर मालेगाव मार्केटमध्ये २१०१ रुपये दर मिळाला.
तसेच मालदांडी ज्वारीला पुणे मार्केटमध्ये सरासरी ०५ हजार ७५० रुपये, बीड मार्केटमध्ये २३०० रुपये, जिंतूर मार्केटमध्ये ३५०० रुपये, परांडा मार्केटमध्ये ०४ हजार रुपये दर मिळाला.
तसेच मुंबई मार्केटमध्ये लोकल ज्वारीला ०५ हजार १५० रुपये, अमरावती मार्केटमध्ये १४५० रुपये, तसेच हायब्रीड ज्वारीला जळगाव मार्केटमध्ये १६०० रुपये, अमळनेर मार्केटमध्ये २२०० रुपये, मलकापूर मार्केटमध्ये २४०० रुपये, तर दादर ज्वारीला जळगाव मार्केटमध्ये २९५० रुपये, नंदुरबार मार्केटमध्ये ०३ हजार २० रुपये तर अमळनेर मार्केटमध्ये ३२०० पर्यंत दर मिळाला.