Jowar Kharedi : यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली असली, तरी खुल्या बाजारात दर कोसळल्याने हमी केंद्र हाच त्यांचा एकमेव आधार उरला आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ३,३७१ प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदीस ३० जूनपर्यंतच मुदत आहे. (Jowar Kharedi)
जिल्ह्याचे उद्दिष्ट ५० हजार क्विंटल असताना, अजूनही ४२ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आणि हमी केंद्र चालकांची अवस्था चिंताजनक झाली असून, केंद्र बंद होऊ नये यासाठी मुदतवाढीची जोरदार मागणी सुरू आहे.(Jowar Kharedi)
यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली असली, तरी बाजारातील घसरलेल्या दरांमुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. (Jowar Kharedi)
अशा परिस्थितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी दराने (३,३७१ प्रति क्विंटल) सुरू असलेली ज्वारी खरेदी हीच एकमेव आशेची किरण ठरत आहे. मात्र, ही खरेदी फक्त ३० जून पर्यंतच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.(Jowar Kharedi)
हमीभाव केंद्र एकमेव आधार
सध्या बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे दर १ हजार ८०० ते २ हजार रुपये प्रति क्विंटल इतके खाली घसरले आहेत, जे की हमी दराच्या तुलनेत तब्बल १ हजार ३०० ते १ हजार ५०० ने कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एका क्विंटलमागे मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे.
हमी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी
शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हमी केंद्रांवर आपला माल विक्रीसाठी नेत आहेत. अनेक नव्याने सुरू झालेल्या केंद्रांवरही शेतकऱ्यांचा ओघ वाढला आहे. मात्र, हमी खरेदीची मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने केंद्र चालकही अडचणीत आले आहेत. शिल्लक असलेल्या ज्वारीचा खरेदीवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उद्दिष्ट मोठं, वेळ मर्यादित
यवतमाळ जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ५० हजार क्विंटल ठेवण्यात आले आहे. पण आतापर्यंत फक्त ८ हजार क्विंटलच खरेदी झाली आहे. याचा अर्थ अजूनही ४२ हजार क्विंटल ज्वारी खरेदी होणे शक्य आहे, परंतु त्यासाठी वेळ वाढवणे अत्यावश्यक ठरत आहे. शेतकऱ्यांची मागणी: ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवावी
शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर ज्वारी साठा असून, ते हमी दरात विक्रीसाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने देखील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
सध्याची आकडेवारी (यवतमाळ जिल्हा)
उन्हाळी ज्वारीची लागवड: १०,००० हेक्टर
हमी दर: ३,३७१ प्रति क्विंटल
बाजारभाव : १८००-२००० प्रति क्विंटल
हमी खरेदीचे उद्दिष्ट: ५०,००० क्विंटल
आतापर्यंत खरेदी: ८,००० क्विंटल
मुदत: ३० जून
शेतकरी आधीच संकटांत सापडलेला असताना, मुदतीच्या अडथळ्यामुळे हमी दराचा फायदा मिळवणेही अवघड होत आहे. हमी केंद्राची मुदत वाढवण्याचा निर्णय लवकर होणे गरजेचे आहे, अन्यथा हजारो क्विंटल ज्वारी बाजारातील तोट्यात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.
हे ही वाचा सविस्तर : Jowar Kharedi: ज्वारी खरेदीला मुहूर्त मिळेना; काय आहे कारण वाचा सविस्तर