Join us

जळगावची वांगी नाशिकमध्ये खाताय भाव, दर वाढले तरीही पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 1:12 PM

नाशिक शहरासह जिल्ह्यात भरिताच्या वांग्यांना मागणी वाढली आहे. 

एकीकडे थंडी, कधी पाऊस, तर कधी ऊन असं वातावरण असताना भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून नाशिककरांची देखील पसंती वाढू लागली आहे. जळगावातून दररोज मोठ्या प्रमाणात भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे रवाना होत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात भरिताच्या वांग्यांना मागणी वाढली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही प्रसिद्ध आहेत. त्यात भरीताच्या वांग्यांना हिवाळ्यामध्ये जास्त मागणी असते. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व जमीन वांग्यांसाठी पोषक असल्याने भरिताच्या वांग्यांना वेगळीच चव लागत असते. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते. गेल्या आठवड्यात कडाललेले भाज्यांचे दर या आठवड्यात कमी झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून किलोमागे किमान 5 ते 10 रुपयांनी भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. थंडीच्या दिवसात लज्जतदार भरीत खाण्यासाठी जळगावच्या भरिताच्या वांग्यांना मागणी असते. मात्र जळगावचे वांगे नाशिकमध्ये भाव खातायत. येथे 60 ते 70 रुपये किलोप्रमाणे मोठ्या वांग्यांची विक्री होत आहे.

हेच वांगे मागील आठवड्यात 100 रुपये किलोने विक्री झाले. तर जळगावच्या बाजारपेठेत भरिताची वांगी सध्या 30 ते 40 रुपये किलोने विक्री होत आहे. मागील आठवड्यात तेथेही भाव जास्त होता. भरिताच्या वांग्यांची आवक वाढली असली तरी नाशिककरांना मात्र चांगले वांगे 60 ते 70 रुपये किलोनेच घ्यावे लागत आहे. देशभरातील ट्रक चालक नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने त्याच्या दोन दिवस अगोदरच ट्रक जिथल्या तिथे थांबले होते. त्याशिवाय महिनाभरापासून आवकही कमी झाली होती. या दोन कारणांनी भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. नाशिक बाजार समितीत मेथी, कोथंबिर, ढोबळा मिरचीची तिप्पट आवक झाली. काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे, तर मागणी कायम आहे. ट्रक चालकांचा संप मिटला असला, तरीही आवक फारशी वाढलेली नाही. मात्र भावातील चढ- उतार कमी झाली असून पाच ते 10 रुपयांनी सर्वच भाज्या स्वस्त झाल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.

कोथिंबीर, मेथीची विक्रमी आवक

बाजार समितीत सोमवारी कोथिंबिरीची तब्बल आठशे क्चिटल तर मेथीची 900 क्चिटल इतकी प्रचंड आवक झाली. त्यामुळे भावही 10 ते 15 रुपये जुडीप्रमाणे होते.भेंडीचे दर 15 रुपयांनी कमी झाले. मागील आठवड्यात 90 ते 100 रुपये किलो विक्री होणारी भेंडी सध्या 50 ते 60 रुपये किलोने विक्री होत असून गड्डा कोबी, हिरवी मिरची, कारले, वांगे आदी प्रकारच्या भाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत 5 ते 15 रुपयांनी उतरल्याने दिलासा मिळाला.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :जळगावनाशिकवांगी