Indigo Crisis : अलिकडेच, इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठे बिघाड झाले, ज्यामुळे देशांतर्गत हजारो उड्डाणे रद्द झाली. अद्यापही इंडिगोच्या विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रवाशांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. विमान सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका बसलामहाबळेश्वरमधील एक विक्रेता दररोज सुमारे ४५ शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी गोळा करतो आणि देशभरातील बाजारपेठांमध्ये त्यांचा पुरवठा करतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोणतीही खेप पुणे विमानतळावरून गेलेली नाही. विक्रेते फळांची वाहतूक करून दररोज सरासरी ४ लाख ते ५ लाख रुपये उत्पन्न करतात, परंतु आता सर्व काही ठप्प झाले आहे.
पुण्याहून कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी सारख्या विविध ठिकाणी दररोज स्ट्रॉबेरीची वाहतूक केली जाते. दररोज सरासरी सुमारे २.५ टन स्ट्रॉबेरी पाठवल्या जातात. जर स्ट्रॉबेरी रात्री विमानतळावर आल्या तर नुकसान टाळण्यासाठी त्या दुसऱ्या दिवशी बाजारात पोहोचवल्या जातात. फळांचा विमा उतरवलेला नसल्यामुळे, संपूर्ण नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते.
कोट्यवधी रुपयांचे गुलाब कुजले
हा फुल उत्पादकांसाठी महत्वाचा काळ आहे. या काळात लग्नसराईला सुरवात होऊन फुलांना मागणी वाढते. यावेळी इंडिगो एअरलाइन्सच्या बिघाडामुळे देशभरातील फुल उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे, ज्यामुळे दररोज १० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दररोज ४० लाख गुलाब देशाच्या विविध भागात वाहतूक केली जाते. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच १० लाख दररोज हवाई मार्गाने पाठवले जातात. मात्र इंडिगोच्या बिघाडामुळे हे गुलाब विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत.
फुल उत्पादकांचे नुकसान एका गुलाबाची किंमत २० रुपये आहे आणि दररोज १० लाख गुलाबांचे नुकसान ०२ कोटी रुपये आहे. म्हणजेच गेल्या पाच दिवसांत १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई कोण करणार? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या मावळ तालुक्यात अनेक फुलांचे शेत आहेत. येथून मोठ्या प्रमाणात गुलाब विविध राज्यांमध्ये आणि परदेशात निर्यात केले जातात. हवाई सेवा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Web Summary : Indigo flight cancellations have severely impacted Maharashtra farmers, causing losses of ₹10 crore. Strawberry and flower exports are stalled at airports, leading to spoilage. Farmers are bearing the brunt of the disruptions, with no insurance coverage.
Web Summary : इंडिगो की उड़ानें रद्द होने से महाराष्ट्र के किसानों को ₹10 करोड़ का नुकसान हुआ है। स्ट्रॉबेरी और फूलों का निर्यात हवाई अड्डों पर रुका हुआ है, जिससे वे खराब हो रहे हैं। किसान नुकसान उठा रहे हैं, क्योंकि उनके पास कोई बीमा नहीं है।