नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारासाठी (India Amrica Trade Deal) एका आराखड्यावर सहमती झाली. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. पण खऱ्या अर्थाने भारतीय शेतकऱ्यांना भारत अमेरिका ट्रेड डीलचा फायदा होईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील सध्या लावलेले ५० टक्के शुल्क कमी करून ते १८ टक्क्यांवर आणले आहे, तर भारताने सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू आणि अन्न व कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर आयात शुल्क पूर्णपणे रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भरड धान्य, पशुखाद्यासाठी लाल ज्वारी, सुका मेवा, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, मद्य, स्पिरिट यांचा समावेश आहे.
भारताचा फायदा
- वस्त्रोद्योग : कपडे आणि तयार कापड अमेरिकेत स्वस्त मिळतील, त्यामुळे मागणी वाढेल.
- औषध निर्मिती : जेनेरिक औषधांवरील कर शून्य झाल्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळेल.
- हस्तशिल्प : भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना तिथे चांगली किंमत मिळेन
- रत्ने आणि दागिने हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढेल
- चर्मोद्योग : चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे.
अमेरिकेचा फायदा
- शेती आणि पशुखाद्य : अमेरिकी कापूस, बदाम, अक्रोड आणि विशेषता पशुखाद्यासाठी लागणारी लाल ज्चारी भारतात स्वस्त येईल.
- तंत्रज्ञान : अमेरिकन कंपन्यांचे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आणि बेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे भारतात अधिक प्रमाणात विकली जातील.
- ऊर्जा क्षेत्र : भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल व कोळसा खरेदी करील.
- फायदा होणारी प्रमुख क्षेत्रे : वस्त्रोद्योग आणि कपड़े, चामडे आणि पाटबाणे, प्लास्टिक आणि सार, सेंद्रिय रसायने, गृहसजावट, जेनेरिक औषधी, रत्ने आणि हिरे (शुल्क शून्य होईल).
Web Summary : The India-US trade deal is set to boost bilateral trade by reducing import duties. Indian textiles, pharmaceuticals, handicrafts, gems, and leather goods will gain access to the US market. US agriculture, technology, and energy sectors will benefit from increased access to India.
Web Summary : भारत-अमेरिका व्यापार समझौता आयात शुल्क कम करके द्विपक्षीय व्यापार को बढ़ावा देगा। भारतीय वस्त्र, दवा, हस्तशिल्प, रत्न और चमड़े के सामान को अमेरिकी बाजार में पहुंच मिलेगी। अमेरिकी कृषि, प्रौद्योगिकी और ऊर्जा क्षेत्रों को भारत में अधिक पहुंच से लाभ होगा।