Join us

Tur Market : जूनचे पुढील पंधरा दिवस तुरीचे भाव कसे राहतील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:01 IST

Tur Market : मागील तीन वर्षातील तुरीच्या जून मधील सरासरी किंमती कशा आहेत, यंदा कशा राहतील?

Tur Market : सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु.७५५० रुपये प्रति क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती (tur Market) कमी आहेत.

मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली आहे. लातूर बाजारातील संभाव्य किंमती जून २०२५ मध्ये ६ हजार ८०० ते ७ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल अशा राहतील. 

नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जून मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे : 

  • जून २०२२ : ६ हजार २९३ रुपये प्रति क्विंटल
  • जून २०२३ : १० हजार ८२ रुपये प्रति क्विंटल
  • जून २०२४ : ११ हजार १८१ रुपये प्रति क्विंटल

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.०२ लाख टन होण्याची शक्यता आहे. माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. 

चालू वर्ष मे (२२ मे २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. मे २०२५ मध्ये ६.३ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ९.१ लाख टन होती. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १२.६० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रलातूर