Join us

Tur Market : पुढील वीस दिवस तुरीचे प्रति क्विंटल दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:03 IST

Tur Market : नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती  (Tur Bajarbhav) कमी होत आहेत. मे महिन्याच्या उर्वरित दिवसात कशा राहतील?

Tur Market :  नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती  (Tur Bajarbhav) कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या मे मधील सरासरी किंमती पाहिल्या तर मे २०२२ मध्ये ६ हजार ७३ रुपये क्विंटल, मे २०२३ मध्ये ९ हजार ४२ रुपये, मे २०२४ मध्ये ११ हजार ८४५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. 

माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम (Selling Season) असतो. चालू वर्ष एप्रिल (२८ एप्रिल २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहिलेली दिसून येत आहे. एप्रिल २०२५ मध्ये १०.३ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ७.५ लाख टन होती.

सध्याच्या हंगामासाठी (Kharip Season) सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (७५५० रुपये प्रतिक्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. तर या मे महिन्यात उर्वरित वीस दिवस ७ हजार ते ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे.

आयात कमी झाली तर निर्यात वाढलीतूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.११ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १२.६० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली आहे

टॅग्स :तुराशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती