Join us

Hingoli Market Yard : हिंगोली बजारात उद्या शेतमाल व्यवहार बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:43 IST

Hingoli Market Yard : हिंगोलीत गुरुवारी शेतमाल खरेदी-विक्रीला ब्रेक बसणार आहे. ईद-ए-मिलादनिमित्त हमाल बांधवांच्या कार्यक्रमामुळे हळद मार्केटयार्ड आणि मोंढा बंद ठेवण्यात येणार आहेत.(Hingoli Market Yard)

Hingoli Market Yard : हिंगोलीत गुरुवारी शेतमाल खरेदी-विक्रीला ब्रेक बसणार आहे. ईद-ए-मिलादनिमित्त हमाल बांधवांच्या कार्यक्रमामुळे हळद मार्केटयार्ड आणि मोंढा बंद ठेवण्यात येणार आहेत.(Hingoli Market Yard)

हळदीसह सर्वच शेतमालाचा गुरुवारी मार्केटयार्ड आणि मोंढ्यातील व्यवहार बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नियोजन करताना याची नोंद घ्यावी, असे बाजार समितीने कळविले आहे.(Hingoli Market Yard)

हिंगोली जिल्ह्यातील हळद मार्केटयार्ड आणि मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी पूर्णपणे बंद राहणार आहेत. ईद-ए-मिलादनिमित्त हमाल बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे.(Hingoli Market Yard)

ईद-ए-मिलादनिमित्त व्यवहार बंद

मार्केट यार्ड आणि मोंढ्यातील हमाल बांधव गुरुवारी (११ सप्टेंबर) रोजी ईद-ए-मिलाद कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने त्या दिवशी व्यवहार शक्य होणार नाहीत. त्यामुळे गुरुवारी शेतमाल खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजारपेठ गाठू नये, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

शेतमाल आवक मंदावली

सध्या हळदीसह इतर शेतमालाची आवक बाजारात मंदावलेली आहे. भुसार मोंढ्यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे बीट व वजनकाटा दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सुरू असतो. मात्र, ११ सप्टेंबर रोजी सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी नियोजन करून शेतमाल बाजारात आणावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बाजार समितीचा निर्णय

ईद-ए-मिलादनिमित्त हमाल बांधव अनुपस्थित राहणार असल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे थांबतील. यामुळे बाजार समितीने शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांच्या सोयीसाठी ११ सप्टेंबर रोजी बाजार यार्ड आणि मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहिंगोलीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती