Join us

Hingoli Bajar Samiti: हळदीतून सोने काढायचं होतं... पण पावसाने सगळं भिजवलं! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:57 IST

Hingoli Bajar Samiti : हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केटमध्ये (Hingoli Bajar Samiti)विक्रीसाठी आणलेली हळद पावसात भिजल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. २० मे रोजी रात्री अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोरदार मारा झाल्यामुळे शेडखाली ठेवलेली हळद झाकोळली गेली. हळदीचे दर १२ हजार १०० ते १३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असतानाही माल भिजल्यामुळे अनेकांना अपेक्षित भाव मिळाले नाही.

Hingoli Bajar Samiti : हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केटमध्ये (Hingoli Bajar Samiti)विक्रीसाठी आणलेली हळद पावसात भिजल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे.

२० मे रोजी रात्री अवकाळी पावसाचा  (Unseasonal Rain) जोरदार मारा झाल्यामुळे शेडखाली ठेवलेली हळद झाकोळली गेली. हळदीचे दर १२ हजार १०० ते १३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असतानाही माल भिजल्यामुळे अनेकांना अपेक्षित भाव मिळाले नाही.

अवकाळी पावसामुळे  (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या हळदीच्या मालावर पाणी फिरले आहे. २० मेच्या रात्री जोरदार पावसामुळे संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डमध्ये (Hingoli Bajar Samiti)ठेवलेली हळद भिजली.

मराठवाडा व विदर्भातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तब्बल २ हजार ७०० क्विंटल हळद यार्डात दाखल झाली होती. या पावसात शेकडो पोती भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना १२ हजार १०० ते १३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळाल्याने आर्थिक फटका बसला आहे.

यंत्रणांचे दुर्लक्ष

* बाजार समितीने कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. बाजार समितीत फक्त दोन शेड व चार ओटे असूनही पावसाच्या पाण्यापासून माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

* शेडची उंची जास्त असल्याने ओट्याच्या बाजूने ठेवलेली हळद भिजली.

* मालाची मोजणी वेळेत न होणे, वाहन रांगा लागणे, 'कट्टी' करून भावात कपात करणे, या बाबींमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

* बाजार समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना हानी सहन करावी लागली.

पावसामुळे अडचणी

* हळद विक्रीसाठी अनेक शेतकरी २ ते ३ दिवस मुक्कामी थांबत असतात. मात्र त्यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची सोय न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

* अशा पावसाळी हवामानात वाहनांचेही नुकसान होत असल्याने उत्पादनावर आणि भावावर याचा थेट परिणाम होत आहे.

* शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माल सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या सुविधा, वेळीच मोजणी, आणि भावात पारदर्शकता याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Market Yard: पावसामुळे शेतमाल भिजण्याच्या घटना वाढल्या; बाजार समित्यांची अपुरी सुविधा उघड वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहिंगोली