Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Market : नवीन हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे सरासरी काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:20 IST

Harbhara Market :स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातील हरभरा खरेदीला उत्साहात प्रारंभ झाला.

अमरावती  : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ फेब्रुवारी रोजी नवीन हंगामातील हरभरा खरेदीला उत्साहात प्रारंभ झाला. नवीन हंगामाच्या प्रारंभी प्रथम बहुमान पांडुरंग सीताराम तेडे (मु पाथरगाव) व गणपत रामचंद्र गावनर (मु कळमजापूर) या शेतकऱ्यांना देण्यात आला. 

शेतकऱ्यांचा हरभरा खुल्या लिलाव पद्धतीने विक्रीस काढण्यात आला. व्यापारी अनिल गावंडे यांनी सर्वाधिक ५ हजार ३५१ रुपये प्रतिक्विंटल अशी बोली लावत खरेदी केली. पहिल्याच दिवशी सुमारे १५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याचे वीरेंद्र जगताप यांनी सांगितले. 

भारत सरकारने २०२६-२७ या हंगामासाठी हरभरा पिकास ५८७५ रुपये प्रति क्विंटल अशी किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र एमएसपीपेक्षा दर कमी मिळत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत नवीन हरभरा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. या हरभऱ्यास किती दर मिळतो आहे, ते पाहुयात... 

वाचा हरभरा मार्केट दर पुणे मार्केटमध्ये कमीत कमी ६ हजार ५०० रुपये तर सरासरी ६ हजार ७५० रुपये दर मिळाला. जळगाव - मसावत    मार्केटमध्ये चाफा हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार ९०० रुपये तर सरासरी ४ हजार ९२५ रुपये, वरुड मार्केटमध्ये लोकल हरभऱ्याला सरासरी ४ हजार ९६९ रुपये तर पाथरी मार्केटमध्ये ४ हजार ९०० रुपये दर मिळाला.  

Harbhara Market : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हरभऱ्याला काय भाव मिळतील? 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डरब्बी हंगाम