Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Market : आवक वाढली पण भावात तफावत; कोणत्या हरभऱ्याला सर्वाधिक मागणी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:29 IST

Harbhara Market : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Market : हरभऱ्याच्या बाजारात सध्या मिश्र चित्र दिसून येत आहे. काही बाजारात दर्जेदार हरभऱ्याला ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असताना सामान्य व लाल जातींवर दबाव कायम आहे.(Harbhara Arrivals)

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२७ फेब्रुवारी) रोजी हरभऱ्याची एकूण आवक १३,९४१ क्विंटल झाली. सरासरी बाजारभाव ५,३६४ रुपये राहिला.(Harbhara Arrivals)

आवक वाढत असतानाच दर्जानुसार दरात मोठी तफावत दिसून आली. काही बाजारात चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याला जोरदार मागणी राहिली, तर सामान्य व लाल जातींवर दबाव कायम राहिला.(Harbhara Arrivals)

कुठे किती आवक?

विदर्भातील अमरावती बाजारात सर्वाधिक ५ हजार १३३ क्विंटल लोकल हरभऱ्याची आवक झाली. त्यापाठोपाठ अकोला येथे २ हजार २६६ क्विंटल आवक नोंदली गेली. मुंबई बाजारात १ हजार ३४ क्विंटल आवक झाली.

मराठवाड्यातील माजलगाव येथे ७०१ क्विंटल तर हिंगोली येथे ४५० क्विंटल आवक झाली. जळगावमध्ये विविध जातींची मिळून लक्षणीय आवक दिसली.

कोणत्या जातींना जास्त मागणी?

बोल्ड हरभरा – जळगाव बाजारात तब्बल ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांक दर मिळाला.

काबुली हरभरा – अकोला येथे ७ हजार ८७५ रुपये दर मिळाल्याने निर्यातक्षम मालाला मागणी कायम असल्याचे दिसले.

लोकल हरभरा – मुंबईत ७ हजार २०० रुपये सरासरी दर मिळाला.

हायब्रीड हरभऱ्याला कल्याण बाजारात ६ हजार ते ७ हजार रुपये दर मिळाला, जो इतर ठिकाणांपेक्षा जास्त राहिला.

कुठे दर घसरले?

धुळे येथे लाल हरभऱ्याला केवळ ४ हजार ३०० ते ५ हजार रुपये दर मिळाला.

बुलढाणा येथे लाल जातीचा दर ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दरम्यान राहिला.

सिंदी बाजारात लोकल हरभऱ्याला सर्वात कमी ३ हजार ९५५ रुपये दर मिळाला.

कुठे दर वधारले?

पुणे बाजारात हरभऱ्याला ७ हजार रुपये कमाल दर मिळाला.

मुंबईत लोकल हरभऱ्याला ७ हजार ५०० रुपये कमाल दर मिळाला.

उमरखेड-डांकी येथे लाल हरभऱ्याचा दर ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये राहिला.

चाफा व इतर जातींची स्थिती

चाफा जातीला जळगाव, पारोळा आणि मसावत येथे ४ हजार ५०० ते ५ हजार २४१ रुपये दर मिळाला. गरडा जातीला सोनपेठ येथे ५ हजार ते ५ हजार १०० रुपये दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2026
जळगाव---क्विंटल43666568006700
पुणे---क्विंटल40660070006800
माजलगाव---क्विंटल701470051225000
हिंगोली---क्विंटल450482053205070
करमाळा---क्विंटल29495051005000
वडवणी---क्विंटल2520052005200
जळगावबोल्डक्विंटल6800080008000
जळगावचाफाक्विंटल497450052005100
जळगाव - मसावतचाफाक्विंटल47480550504960
पारोळाचाफाक्विंटल70505052415100
सोनपेठगरडाक्विंटल68500051005050
कल्याणहायब्रीडक्विंटल3600070006500
बुलढाणाहायब्रीडक्विंटल15500055005250
जाफराबादहायब्रीडक्विंटल20500052005100
अकोलाकाबुलीक्विंटल23787578757875
तुळजापूरकाट्याक्विंटल43490050004950
धुळेलालक्विंटल73430050004500
जळगावलालक्विंटल142500056005600
बीडलालक्विंटल48480050804945
जिंतूरलालक्विंटल40495050355021
शेवगाव - भोदेगावलालक्विंटल3450045004500
औराद शहाजानीलालक्विंटल102515152475199
बुलढाणालालक्विंटल60450049004700
उमरखेड-डांकीलालक्विंटल60550056005550
अकोलालोकलक्विंटल2266500052855150
अमरावतीलोकलक्विंटल5133480053565078
मुंबईलोकलक्विंटल1034600075007200
परांडालोकलक्विंटल6500050005000
सेनगावलोकलक्विंटल42495051005000
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल6455050004775
बाभुळगावलोकलक्विंटल450490151505001
काटोललोकलक्विंटल155475050214900
पुलगावलोकलक्विंटल241465050504900
सिंदीलोकलक्विंटल107395550004600
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1215495051005000
दुधणीलोकलक्विंटल550480051405063
जळगावनं. १क्विंटल10540054005400
सोलापूरपिवळाक्विंटल141500051405100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : बोल्ड-काबुलीला सोन्याचा भाव; लोकलला किती मिळाला दर? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Harbhara Bajarbhav : हरभऱ्याला मिळतोय का एमएसपी दर; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Market: Increased Arrivals, Price Differences; Which Chickpea is in Demand?

Web Summary : Chickpea market shows mixed trends. Good quality fetches high prices, while common varieties face pressure. Bold and Kabuli types see strong demand, but red chickpea rates decline in some markets, creating price variations.
टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती