Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Bajarbhav : हरभऱ्याची मोठी आवक; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:01 IST

Harbhara Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Harbhara Bajarbhav : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरुवार (१२ मार्च) रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक(Harbhara Arrivals) झाली.

राज्यातील बाजारात सुमारे ३३,२६० क्विंटल हरभरा दाखल झाला असून सरासरी दर ५,२१२ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदविण्यात आला. (Harbhara Arrivals)

वाढत्या आवकेमुळे काही बाजार समित्यांमध्ये दरांवर दबाव दिसून आला, तर दर्जेदार मालाला काही ठिकाणी चांगला भाव मिळाल्याचे चित्र दिसून आले.(Harbhara Arrivals)

काही बाजारांत चांगले दर

काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला चांगले दर मिळाले.

पुणे बाजारात हरभऱ्याचा कमाल दर ६,८०० रुपये तर सरासरी ६,४५० रुपये नोंदविण्यात आला.

उमरखेड आणि उमरखेड-डांकी बाजारात कमाल दर ५,६०० रुपये तर सरासरी ५,५०० रुपये मिळाला.

लातूर बाजारात मोठी आवक होत असून सरासरी दर ५,२३० रुपये राहिला.

नागपूर बाजारात ६,६९८ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर ५,०७२ रुपये नोंदविण्यात आला.

मुंबई बाजारात सर्वाधिक दर

मुंबई बाजारात हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळाला. येथे कमीत कमी ६,००० रुपये तर कमाल ७,५०० रुपये दर नोंदविण्यात आला असून सरासरी दर ७,२०० रुपये होता.

काही बाजारांत दर कमी

काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर तुलनेने कमी राहिले.

आष्टी (वर्धा) येथे सरासरी दर ४,५०० रुपये नोंदविण्यात आला.

धुळे, हिंगोली, परतूर आदी बाजारांमध्ये सरासरी दर ४,८५० ते ५,००० रुपयांदरम्यान राहिला.

आवक वाढल्याने दरात चढ-उतार

सध्या राज्यातील अनेक भागांत हरभरा काढणी सुरू असल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढत आहे. त्यामुळे काही बाजारांत दरांवर दबाव दिसून येत असला, तरी चांगल्या प्रतीच्या मालाला समाधानकारक दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/03/2026
पुणे---क्विंटल42610068006450
माजलगाव---क्विंटल957470051005000
सिन्नर---क्विंटल3473053655100
पैठण---क्विंटल2530053005300
हिंगोली---क्विंटल800480052805040
कारंजा---क्विंटल2450480051505050
करमाळा---क्विंटल58490051015000
आष्टी (वर्धा)---क्विंटल200400050654500
राहता---क्विंटल16511651505130
जळगावबोल्डक्विंटल37515053255325
जळगावचाफाक्विंटल241480050454900
जळगाव - मसावतचाफाक्विंटल92481549714900
पाचोराचाफाक्विंटल1000480050154911
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल39490051015000
अकोलाकाबुलीक्विंटल3450045004500
जळगावकाबुलीक्विंटल84520067006300
मालेगावकाट्याक्विंटल15458050554780
तुळजापूरकाट्याक्विंटल135505050505050
लातूरलालक्विंटल6315512553755230
लातूर -मुरुडलालक्विंटल31500051515125
धुळेलालक्विंटल428480050504900
जळगावलालक्विंटल116480064506325
पवनीलालक्विंटल8510051005100
बीडलालक्विंटल25490052005063
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल106470050004850
गंगापूरलालक्विंटल48485050254995
निलंगालालक्विंटल205490052405100
चाकूरलालक्विंटल28440053115106
औराद शहाजानीलालक्विंटल335515052755212
उमरखेडलालक्विंटल360540056005500
उमरखेड-डांकीलालक्विंटल600540056005500
चिमुरलालक्विंटल100480050004900
अकोलालोकलक्विंटल2785488052955120
अमरावतीलोकलक्विंटल7176480052005000
नागपूरलोकलक्विंटल6698480051625072
मुंबईलोकलक्विंटल1632600075007200
परतूरलोकलक्विंटल20460051005000
तळोदालोकलक्विंटल40507853505335
कुर्डवाडी-मोडनिंबलोकलक्विंटल59465149704850
लोहालोकलक्विंटल18515152015181
देवळालोकलक्विंटल1410050155015
दुधणीलोकलक्विंटल255490052455130
देवणीलोकलक्विंटल23530053325316
ताडकळसनं. १क्विंटल798490053005200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Harbhara Bajarbhav : हरभरा विकण्याआधी हे पाहा; आज राज्यातील बाजारात दर कसे राहिले?

अधिक वाचा :Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

English
हिंदी सारांश
Web Title : Gram Arrival Surge: Where to Find the Best Market Prices?

Web Summary : Gram arrivals surge in Maharashtra markets, with Mumbai offering top prices (₹7,200/quintal). Pune averages ₹6,450. Increased supply impacts rates, but quality produce fetches good prices. Check detailed market rates.
टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती