Halad Market : मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीची किंमत १६ हजार ३६३ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ३७.७३ टक्के व ५.८८ टक्के इतकी वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी सांगली बाजारात हळदीची सरासरी किंमत सर्वाधिक १६ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होती, तर रिसोड बाजारात सर्वात कमी किंमत १४ हजार २१५ रुपये प्रति क्विंटल होती. २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीयदराने वाढण्याची अपेक्षा आहे.
सन २०२३-२४ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत. कुठल्या बाजारात काय दर मिळाले, ते देखील पाहुयात...
१५ जानेवारीचे मार्केट वाशीम मार्केट - लोकल जात - कमीत कमी १२ हजार १०० रुपये, सरासरी १३ हजार ७०० रुपये
१४ जानेवारीचे मार्केट मुंबई मार्केट - लोकल जात - कमीत कमी १८ हजार ५०० रुपये, सरासरी २० हजार ७५० रुपये
१३ जानेवारीचे मार्केट हिंगोली मार्केट- सर्वसाधारण- कमीत कमी १४ हजार ५०० रुपये, सरासरी १५ हजार ६५० रुपये मुंबई मार्केट - लोकल जात - कमीत कमी १८ हजार ५०० रुपये, सरासरी २० हजार ७५० रुपये
१२ जानेवारीचे मार्केट हिंगोली मार्केट- सर्वसाधारण- कमीत कमी १४ हजार रुपये, सरासरी १५ हजार २५० रुपये सांगली मार्केट - राजापुरी जात - कमीत कमी १४ हजार ५०० रुपये, सरासरी १६ हजार ७०० रुपये
Web Summary : Turmeric prices rose this week, especially in Hingoli. Maharashtra leads in turmeric cultivation. Sangli had peak prices; Risod, the lowest. Mumbai market rates reached ₹20,750.
Web Summary : हल्दी की कीमतों में इस सप्ताह वृद्धि हुई, खासकर हिंगोली में। महाराष्ट्र हल्दी की खेती में अग्रणी है। सांगली में सबसे अधिक कीमतें थीं; रिसोड में सबसे कम। मुंबई बाजार दरें ₹20,750 तक पहुंचीं।