Halad Market : वाशिम स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (२३ जानेवारी) रोजी हळदीची सुमारे २५० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. (Halad Market)
मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. (Halad Market)
विशेषतः गट्टू आणि कान्डी या दोन्ही प्रकारच्या हळदीच्या दरात घट झाल्याचे बाजारातील लिलावातून स्पष्ट झाले आहे.(Halad Market)
मागील आठवड्यात बाजार समितीत कान्डी हळदीला प्रतिक्विंटल १३ हजार ७०० ते १५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत होता, तर गट्टू हळदीला १२ हजार १०० ते १३ हजार ९०० रुपये दर मिळाला होता.
मात्र २३ जानेवारी रोजी झालेल्या लिलावात कान्डी हळद १३ हजार २०० ते १५ हजार ४०० रुपये दराने, तर गट्टू हळद ११ हजार १०० ते १३ हजार ९०० रुपये दराने विक्री झाली.
यामुळे गट्टू हळदीच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रुपयांची, तर कान्डी हळदीच्या दरात सुमारे ५०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.
हळदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लागवड खर्च, मजुरी, वाहतूक आणि प्रक्रिया खर्च वाढत असताना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने हळद साठवून ठेवली होती. मात्र सध्या दर घसरल्याने विक्री करावी की प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते पुढील काळात हळदीची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून, तसे झाल्यास दरांवर आणखी दबाव येऊ शकतो.
देशांतर्गत मागणी स्थिर असली तरी बाह्य बाजारपेठेतील हालचाली आणि आवक यावर दर अवलंबून राहणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी आठवड्यांत हळदीच्या बाजाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे ही वाचा सविस्तर :Rajma Cultivation : कमी खर्च, चांगला दर; राजमा पिकाची शेतात जोरदार एंट्री
Web Summary : Turmeric prices fell in Washim market, impacting farmers. Gattu and Kandi varieties saw drops, with Gattu falling by ₹1000/quintal. Farmers face concerns over reduced profits amid rising costs. Traders predict increased supply may further depress prices, affecting farmer decisions.
Web Summary : वाशिम मंडी में हल्दी की कीमतों में गिरावट से किसान प्रभावित हैं। गट्टू और कंडी किस्मों में गिरावट आई, गट्टू में ₹1000/क्विंटल की गिरावट आई। बढ़ते खर्चों के बीच किसानों को कम मुनाफे की चिंता है। व्यापारियों का अनुमान है कि आपूर्ति बढ़ने से कीमतें और गिर सकती हैं, जिससे किसानों के फैसले प्रभावित होंगे।