Join us

Halad Market : हळदीच्या आवकमध्ये 19.32 टक्के इतकी घट, काय बाजारभाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 18:36 IST

Halad Market : मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी हिंगोली बाजारात हळदीची सरासरी किंमत इतकी मिळाली.

Halad Market : मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकमध्ये (Halad Arrival) राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ३१.९६ टक्के व १९.३२ टक्के इतकी घट झाली आहे. तर मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी हिंगोली बाजारात हळदीची सरासरी किंमत सर्वाधिक रु. १३६१३ रुपये क्विंटल होती, तर रिसोड बाजारात सर्वात कमी किंमत रु. १२६०० रुपये क्विंटल होती.

हळदीचे साप्ताहिक बाजारभाव (Halad Market) पाहिले असता ०३ नोव्हेंबर रोजी प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार रुपयांपर्यंत होते. यानंतर १० नोव्हेंबर रोजी हे भाव वाढून पुन्हा एकदा १७ नोव्हेंबरपर्यंत खाली आले. तर २४ नोव्हेंबर रोजी सरासरी १२ हजार ९६१ रुपयांचा दर मिळाला. मागील आठवडयात सांगली बाजारात हळदीची किंमत रु. १२ हजार ९६१ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात (Turmeric Market) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 

काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव पाहिले असता नांदेड बाजारात १२ हजार ८०० रुपये, वसमत बाजारात १२ हजार ८३२ रुपये, तर रिसोड बाजारात 12 हजार 600 असा बाजार भाव मागील आठवड्यात मिळाला. जर आवकेचा विचार केला तर 3 नोव्हेंबर रोजी आवक खाली आली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी आवक वाढली. पुन्हा १७ नोव्हेंबर पासून आवकेत घट झाल्याचे दिसून येत आहे. 

लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा२०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९% च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अहवाल हळद आउटलूकने दिला आहे.

टॅग्स :मार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीलातूर