Join us

Halad Bajarbhav : मुंबई बाजारात हळदीचा भाव टिकून, हिंगोली बाजारात काय बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:41 IST

Halad Bajarbhav : आज रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी हळदीची 3938 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव?

Halad Market : हळदीच्या दरात घसरण सुरू असल्याचे चित्र आहे. आज रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी हळदीची 3938 क्विंटलची आवक झाली. तर हळदीला कमीत कमी 11 हजार 870 रुपये तर सरासरी 16 हजार 500 रुपये दर मिळाला. 

आजच्या बाजार भाव अहवालानुसार हिंगोली बाजारात सर्वसाधारण हळदीची 1991 क्विंटल आवक होऊन 13 हजार 475 रुपये सरासरी दर मिळाला. तर याच बाजारात लोकल हळदीला सरासरी 13000 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारात लोकल हळदीचे दर स्थिर असून गेल्या आठ दिवसांपासून 16 हजार 500 रुपयांचा दर टिकून आहे. 

तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात नंबर एक च्या हळदीला सरासरी 11 हजार 870 रुपये दर मिळाला. तर वाशिम जिल्ह्यात लोकल हळदीला 13 हजार 100 रुपये दर मिळाला. तर नांदेड बाजारातील हळदीचे दर पाहिले असता 4 सप्टेंबर रोजी 12 हजार 800 रुपये, तर 5 सप्टेंबर रोजी 13 हजार 300 दर मिळाल्याचे दिसून आले.

वाचा आज काय भाव मिळाला? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/09/2024
हिंगोली---क्विंटल1991125001445113475
वाशीमलोकलक्विंटल1800125501400113100
मुंबईलोकलक्विंटल48140001900016500
सेनगावलोकलक्विंटल91110001400013000
जिंतूरनं. १क्विंटल8118701250011870
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डमुंबईहिंगोली