Join us
Daily Top 2Weekly Top 5

Halad Bajarbhav : हळदीने तोडले सर्व रेकॉर्ड; बाजारात मिळाला जबरदस्त भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:19 IST

Halad Bajarbhav : हळदीच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नांदेड बाजारात हळदीला तब्बल १५,६९० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. (Halad Bajarbhav)

Halad Bajarbhav : नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) (६ एप्रिल) रोजी शेतीमालाच्या लिलावात मोठी उलाढाल पाहायला मिळाली. (Halad Bajarbhav)

नवीन हंगामातील आवक वाढत असतानाच हळदीच्या दराने जोरदार झेप घेत प्रतिक्विंटल १५,६९० रुपयांचा उच्चांकी भाव मिळवला. या दरवाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Bajarbhav)

हळदीला विक्रमी दर; शेतकरी आनंदात

सोमवारी झालेल्या लिलावात हळद काडीला कमाल १५,६९० रु. दर मिळाला, तर सरासरी दरही १४,८९० रुपयांच्या आसपास राहिला.

हळद गोळ्यालाही चांगला प्रतिसाद मिळून १३,९०० रु. सरासरी भाव नोंदवला गेला.

नवीन हंगामातील वाढती आवक आणि दर्जेदार मालामुळे बाजारात हळदीच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

तुरीला तेजी; इतर पिके स्थिर

हळदीसोबतच तुरीच्या दरातही तेजी कायम असून ७ हजार ८०० रु. प्रति क्विंटल दराने खरेदी झाली. मात्र, सोयाबीन आणि हरभऱ्याचे दर स्थिर राहिले असून त्यामध्ये मोठे चढ-उतार दिसून आले नाहीत.

गव्हाच्या दरात घसरण

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गव्हाच्या दरात किंचित घसरण झाली आहे.

किमान दर : २,१४० रु.

कमाल दर : २,६०० रु.

सरासरी दर : २,३७० रु.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत गव्हाचा भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सोमवारचे बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपये)

गहू : २,१४० – २,६०० रु. (सरासरी २,३७० रु.)

ज्वारी (टाळकी) : ३,११५ – ३,८३५ रु. (सरासरी ३,४७५ रु.)

चना (एनएफएक्यू) : ५,१०० – ५,१७५ रु. (सरासरी ५,१३५ रु.)

तूर (एनएफएक्यू) : कमाल ७,८०० रु.

सोयाबीन (एनएफएक्यू) : ४,९०० – ५,४०० रु. (सरासरी ५,१७५ रु.)

हळद काडी : १३,२०० – १५,६९० रु. (सरासरी १४,८९० रु.)

हळद गोळा : १३,००० – १४,३४५ रु. (सरासरी १३,९०० रु.)

दर्जेदार मालाला चांगला भाव

बाजार समितीने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “शेतीमाल स्वच्छ आणि दर्जेदार स्वरूपात आणल्यास अधिक चांगला भाव मिळू शकतो.”

आवक आणि गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार होत असल्याने विक्रीपूर्वी मालाची योग्य तयारी करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हळदीच्या दरातील वाढ ही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब ठरत असताना इतर पिकांमध्ये मात्र मिश्र चित्र आहे.

विशेषतः गव्हाच्या कमी दरामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. आगामी काळात बाजारातील आवक, मागणी आणि निर्यात स्थितीवर दरांचा कल अवलंबून राहणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Bajarbhav : पिवळं सोनं चमकलं; 'या' बाजारात मिळाला १५ हजारांचा भाव

अधिक वाचा : Chana Procurement : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; 'पणन'कडून हरभरा खरेदीला हिरवा कंदील

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Shines: Record Prices Achieved at Nanded Market

Web Summary : Nanded market sees high turmeric prices, reaching ₹15,690/quintal. Tur prices also surge, while soybean and chickpea rates remain steady. Wheat prices slightly decline. Farmers seek higher prices reflecting production costs, especially for turmeric.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार