Join us

Halad Bajar bhav : हिंगोलीत हळदीच्या आवकेत वाढ; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:48 IST

Halad Bajar bhav : हिंगोली येथील मार्केट यार्डात हळदीची दररोज हजारो क्विंटलची आवक होत असूनही, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी निराश आहेत. एप्रिलपासून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी शेवटी आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. (Halad arrival)

Halad Bajar bhav : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सध्या हळदीची मोठी आवक होत असली, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आहे. (Halad arrival)

एप्रिलपासून पाच महिने भाववाढीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे.(Halad arrival)

भावात घसरण, अपेक्षा भंगल्या

गेल्यावर्षी १४ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली गेलेली हळद यंदा केवळ १० ते १२ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थसंकल्प कोलमडले आहेत. हळदीच्या उत्पादनासाठी एकरी जवळपास ६० ते ८० हजार रुपये खर्च येतो, त्यामुळे अशा दरात विक्री केल्यास फारसा नफा राहत नाही.

हळद लागवडीसाठी वाढलेले आकर्षण

सोयाबीनच्या दरातील सातत्यपूर्ण घसरण पाहता, मागील काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 

हळदीला बाजारात मागणी आणि मागील वर्षी समाधानकारक दर मिळाल्यामुळे यंदाही काही भागांमध्ये लागवड वाढविण्यात आली. मात्र, अपेक्षेप्रमाणे बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

चार दिवसांची आवक (क्विंटलमध्ये)

दिनांकहळदीची आवक (क्विंटलमध्ये)
२८ जुलै२,२००
२९ जुलै१,९१०
३० जुलै१,८००
३१ जुलै२,०५०

हे ही वाचा सविस्तर : Jowar Kharedi : शेतकऱ्यांना हमी दराचा थेट लाभ; ज्वारी विक्रीने विक्रमी कमाई वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहिंगोली