Join us

Groundnut Market : 'या' बाजारात भुईमूगाची आवक घटली; दरात सुधारणा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:52 IST

Groundnut Market : मोंढ्यात भुईमूग शेंगांच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या भाव ५ हजार ५०० रुपयांच्या जवळ पोहोचला असला, तरी हंगामात माल विकून टाकल्याने बहुतांश शेतकरी या दरवाढीपासून वंचित राहिले आहेत.(Groundnut Market)

Groundnut Market : मोंढ्यात भुईमूग शेंगांच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या भाव ५ हजार ५०० रुपयांच्या जवळ पोहोचला असला, तरी हंगामात माल विकून टाकल्याने बहुतांश शेतकरी या दरवाढीपासून वंचित राहिले आहेत. (Groundnut Market)

हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात भुईमूग शेंगांच्या दरात हळूहळू वाढ होत असली तरी शेतकऱ्यांच्या हातात माल नसल्याने त्यांना याचा फायदा होत नाही. (Groundnut Market)

७ ऑगस्ट रोजी बाजारात सुमारे १०० क्विंटल भुईमूग शेंगा विक्रीसाठी (Groundnut arrivals) आल्या. यावेळी किमान दर ५ हजार १०० रुपये, तर कमाल दर ५ हजार ६८५ रुपये प्रतिक्विंटल मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात प्रतिक्विंटलमागे जवळपास ३०० रुपयांची वाढ झाली आहे.(Groundnut Market)

दर वाढले तरी शेतकरी हात रिकामे

दरवाढ ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असली, तरी हंगामात कमी दर मिळाल्यामुळे अनेकांनी भुईमूग लवकरच विकून टाकला आहे. त्यामुळे सध्या शेतात किंवा कोठारात भुईमूग शिल्लक नाही.

लागवड खर्चाच्या तुलनेत हंगामात मिळालेला सरासरी ५ हजार रुपयांचा दर अपुरा ठरत असल्याने शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, दीर्घकाळ दरात वाढ न झाल्याने आणि व्यापाऱ्यांकडून शाश्वती न मिळाल्याने विक्री करावी लागली.

सध्या सरासरी भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परंतु माल कमी आल्याने व्यापाऱ्यांची खरेदी मर्यादित आहे. नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात होत असलेली घटही दरवाढीमागील एक मोठे कारण आहे.

मोंढ्यातील सरासरी आवक दररोज १५० ते ३०० क्विंटल

भुईमूग शेंगांबरोबरच तुरीलाही चांगला दर मिळत आहे. सध्या तुरीचा सरासरी भाव ६ हजार १०० रुपये, तर भुईमूगाचा सरासरी भाव ५ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल नोंदवला जात आहे.

मात्र, शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की हंगामात भाव पडतो आणि शेतमाल संपल्यानंतर भाव वाढतो. त्यामुळे हंगामातच समाधानकारक भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सध्याचे सरासरी भाव (७ ऑगस्ट)

शेतमालसरासरी भाव (₹/क्विंटल)
तूर६,१००
भुईमूग५,३५०

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहिंगोलीमार्केट यार्डतुरातूर