Agriculture News : किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (बिगर आदिवासी क्षेत्रात) व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी क्षेत्रात) या दोन अभिकर्ता संस्थांतर्गत कार्यरत खरेदी केंद्राच्या प्रभावी संनियंत्रणाकरिता ५ सदस्यीय जिल्हानिहाय दक्षता पथके नेमण्यात येणार आहेत.
दक्षता पथकाची रचना सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी- अध्यक्षनिरिक्षण अधिकारी - सदस्य२ पुरवठा अधिकारी- सदस्यगोदाम व्यवस्थापक-सदस्य
उद्दिष्ट : धान/भरडधान्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकता, किमान आधरभूत खरेदी निकषांचे पालन, लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेत व योग्य मोबदला सुनिश्चित करणे तसेच खरेदी प्रक्रियदरम्यान अनियमितता व गैरव्यवहार टाळणे.पथकाची कार्यकक्षा - खरेदी केंद्रावर व गोदामावर तपासवयाची सुची/दक्षता पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल
अ. खरेदी केंद्रांवर तपासणी करावयाची बाबी -
- शेतकरी नोंदणी करण्यासाठी अभिकर्ता संस्थांमार्फ़त नियुक्त खरेदी केंद्रांनी नोंदणी करतांना घेतलेले ऑनलाईन ७/१२ उता-यानुसार व प्रत्यक्ष गाव नंबर १२ (पिकपेरा) नुसार असलेल्या पिक नोंदणी.
- अभिकर्ता संस्थांमार्फ़त नियुक्त खरेदी केंद्रांकडुन नोंदणी केलेल्या सातबारा धारक शेतक-यांचे आधारकार्ड व त्यांचे बँक खाते याचा तपशिल.
- संस्थेकडे PoS मशिनची उपलब्धता तसेच सर्व शेतकऱ्यांची नोंदणी ही POS मशिनव्दारे करण्यात आली आहे याबाबतची पडताळणी करणे.
- विहीत नमुन्यात लेखा पुस्तके व अभिलेख जतन करण्यात आले आहेत का याची माहिती घेणे.
- खरेदी केंद्राकडे आवश्यक मूलभूत साधन सामुगी ज्यामध्ये, मॉयश्वर मिटर, चाळणी, ताडपत्री, इलेक्ट्रानिक वजन काटा, संगणक, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग इ. यांचा समावेश असेल.
- शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची ऑनलाईन पावती संबंधीत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत याची तपासणी करणे.
- खरेदी केंद्रावरील इलेट्रॉनिक वजन काट्यांची वैध प्रमाणपत्रे.
सदर शासन निर्णयाबाबतच्या अधिक माहितीसाठी इथे जाऊन या निर्णयाचा जीआर पाहता येईल.
Web Summary : To ensure transparent MSP procurement, the government is forming district-level vigilance squads. These squads will monitor purchase centers, check farmer registrations, and verify equipment, ensuring fair practices and timely payments to farmers, preventing irregularities in the process.
Web Summary : पारदर्शी एमएसपी खरीद सुनिश्चित करने के लिए, सरकार जिला-स्तरीय सतर्कता दल बना रही है। ये दल खरीद केंद्रों की निगरानी करेंगे, किसान पंजीकरण की जांच करेंगे, और उपकरणों का सत्यापन करेंगे, जिससे उचित प्रथाओं और किसानों को समय पर भुगतान सुनिश्चित किया जा सके, और प्रक्रिया में अनियमितताओं को रोका जा सके।