Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gahu Bajarbhav : आवक कमी तरी गव्हाचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 18:06 IST

Gahu Bajarbhav : गव्हाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी मिळत असल्याने किमान आधार भावाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (Gahu Bajarbhav)

Gahu Bajarbhav : गव्हाच्या हंगामाला सुरुवात होत असतानाच गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (Gahu Bajarbhav)

कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गव्हाची आवक तुलनेने कमी असतानाही दरात लक्षणीय घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Gahu Bajarbhav)

मागील पंधरा दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिक्विंटल ३५० ते ४०० रुपयांनी घट झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्हाच्या काढणीला सुरुवात झाली असून काढलेला गहू विक्रीसाठी शेतकरी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत.

मात्र, हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित प्रमाणात गव्हाची आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्या बाजार समितीत दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

सुरुवातीला चांगला दर, आता घसरण

हंगामाच्या सुरुवातीच्या काळात गव्हाला बाजारात चांगला दर मिळत होता. त्या वेळी प्रतिक्विंटल २,००० ते २,७०० रुपये असा दर मिळत होता.

मात्र, मागील काही दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होत असून सध्या गहू १,८०० ते २,२०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

बाजार समितीच्या माहितीनुसार, गव्हाला २,६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर काही प्रमाणात आवक वाढली असली तरी दर घसरले. गेल्या १५ ते १७ दिवसांमध्ये दर सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा गव्हाचा पेरा वाढला

यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६७ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली असून ती सरासरीपेक्षा जास्त असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

पेरा वाढल्यामुळे पुढील काळात बाजारात गव्हाची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता

सध्या आवक कमी असतानाही दर घटत असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

पुढील काही दिवसांत बाजारात गव्हाची आवक वाढल्यास दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

किमान आधार भावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

गव्हाच्या दरातील घसरणीमुळे किमान आधार भाव (MSP) या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बाजारभाव कमी होत असताना शेतकऱ्यांना किमान आधार भावानुसार दर मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

उत्पादन खर्च वाढल्याची शेतकऱ्यांची खंत

गव्हाच्या लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत गव्हाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात.

गव्हाच्या लागवडीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सध्या बाजारात मिळणारे दर कमी असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- संतोष टिकार,शेतकरी, टेंभुर्णा

सध्या गव्हाच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत असून, येत्या काही दिवसांत बाजारातील परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घसरणीची कारणे

* काही भागात आवक वाढण्याची शक्यता

* व्यापाऱ्यांकडून कमी खरेदी

* बाजारातील मागणी कमी

* पेरा जास्त झाल्याने पुढे उत्पादन वाढण्याची शक्यता

हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav : गहू बाजारात पडझड; महिनाभरात तब्बल 'इतक्या' रुपयांनी भाव घसरले वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Wheat Prices Crash Despite Low Supply: Farmers Worried

Web Summary : Wheat farmers face concerns as prices fall despite low market supply. Prices have dropped by ₹350-400 per quintal recently. Increased cultivation and potential for higher yields are expected. Farmers demand Minimum Support Price (MSP) amidst rising production costs.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड